शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धारावीतील धक्कादायक घटना; रेल्वे अधिकाऱ्याला घरात डांबून मारहाण करत काढला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:10 IST

Shocking incident in Dharavi :व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून ६ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना धारावीत घडली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनीषा म्हात्रे मुंबई : 'अंकल अंदर आओ... असे म्हणत तरुणीच्या बोलावण्यावरुन तिच्या घरात जाणे एका रेल्वे अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. घरात जाताच तरुणींसह तिच्या नातेवाईकांनी रेल्वे अधिकाऱ्याला बेदम चोप दिला आणि तरूणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे कबूल करुन घेत त्याचा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून ६ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना धारावीत घडली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.         

सेंट्रल रेल्वेत कार्यरत असलेले ४६ वर्षीय तक्रारदार हे रेल्वे वसाहतीत कुटुंबियांसोबत राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यापूर्वी ते धारावीतील नित्यानंद चाळीत रहात होते. त्यांच्या शेजारी राहण्यास असलेल्या तरुणीसह तिच्या कुटुंबियासोबत त्यांचे घरचे संबंध होते. गेल्यावर्षी त्यांनी दुसरीकडे राहण्यास जात असल्याने शेजारच्या तरुणीला मोबाईल विकत घेण्यास पैशांची मदत केली होती. त्यापैकी ९ हजार रुपये तिने परत केले. चार हजार रुपये देणे बाकी होते.          

तरुणीने  २९ जानेवारी रोजी तरुणीने कॉल करून सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घरी येऊन पैसे घेऊन जाण्यास सांगितले. ते तरुणीच्या घरी पोहचले.  दरवाजातच उभ्या असलेल्या तरुणीने 'अंकल अंदर आओ' असे बोलून घरात नेले. त्यावेळी घरामध्ये, तिच्या आत्याचा मुलगा आनंद, त्याची पत्नी, बहीण आणि  मित्र राँजर बेनी असे हजर होते.  तक्रारदार हे घरात जाताच, एकाने दरवाजा बंद करत, तरुणीसोबत काय संबंध आहे? म्हणत त्यांना शिवीगाळ सुरु केली. काही समजण्याच्या आतच त्यांना लाथाबुक्क्यांसह हातात मिळेल त्या वस्तूने मारहाण सुरु केली. तरुणीसोबत संबंध असल्याचे त्यांना कबुल करण्यास सांगत एकाने व्हिडीओ बनविला. यावेळी त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने तक्रारदार यांनी भितीने होकार दिला.

काय सांगता! चोरट्याने थेट बिट चौकीतूनच पळवला पोलिसाचा लॅपटॉप; सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद         

पुढे हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी १० लाखांची मागणी केली. पुढे, पैसे घेवूनही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना घर सोडुन जाण्यासाठी तगादा लावला. अखेर त्यांच्या त्रासाला कंटाळून तक्रारदार हे गेल्या महिन्यात रेल्वे वसाहतीत राहण्यास गेले. त्यानंतर, धाडस करून पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. पीएफ खाते केले रिकामी ...तक्रारदार यांच्याकडे पैसे नसल्याने आरोपीनी त्यांना पीएफ खात्यातून पैसे काढण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी पीएफमधून ६ लाख रुपये काढून आरोपीना दिले आहे.

 

अद्याप अटक नाही...तरुणीसह तिच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरु आहे. अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.  - बळवंत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धारावी पोलीस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई