उच्च शिक्षण घेऊन बड्या कॅपजेमिनी कंपनीत कार्यरत असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला लैंगिक आरोग्याच्या समस्यांवर उपचार करण्याच्या नावाखाली ४८ लाख रुपयांहून अधिक रकमेला फसविण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार बंगळूरूमध्ये उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्वरित उपाय देण्याचा दावा करणाऱ्या तंबूतील भोंदू बाबाने दिलेल्या कथित आयुर्वेदिक औषधांमुळे इंजिनिअरचे आरोग्य सुधारण्याऐवजी त्यांची किडनी निकामी झाली आहे. उपचारासाठी त्यांनी बँक आणि मित्रांकडून कर्ज घेतले होते.
लग्नानंतर सुरू झाली समस्या
कर्नाटकातील शिवमोग्गा येथील रहिवासी असलेल्या या सॉफ्टवेअर इंजिनिअरचे २०२३ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर काही खासगी आरोग्य समस्यांमुळे ते खूप त्रस्त होते. यावर त्यांनी केन्गेरी येथील एका मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयात उपचारही सुरू केले होते. मे २०२५ मध्ये त्यांचा उपचार सुरू असतानाच, त्यांना केएलई लॉ कॉलेजजवळ रस्त्यावर एक आयुर्वेदिक तंबू दिसला, ज्यावर 'त्वरित समाधान' मिळेल असे लिहिले होते. त्रासलेल्या अवस्थेत त्यांनी त्या तंबूत प्रवेश केला.
या तंबूत त्याला विजय नावाचा एक व्यक्ती भेटला, ज्याने स्वतःला आयुर्वेदिक उपचार तज्ज्ञ म्हणून ओळख करून दिली. त्याने दुर्मीळ जडी-बुटी आणि विशेष तेलांच्या साहाय्याने समस्या कायमस्वरूपी संपवण्याचा दावा केला. उपचारासाठी गुरुजींनी यशवंतपूर येथील एका दुकानातून 'देवरज बुटी' नावाचे औषध विकत घेण्यास सांगितले, ज्याची किंमत त्यांनी १.६ लाख रुपये प्रति ग्रॅम इतकी सांगितली.
बँकेतून कर्ज आणि मित्रांकडून उसने; ४८ लाखांची लूट
विजयच्या बोलण्यावर विश्वास ठेवून इंजिनिअरने लगेच ती महागडी बुटी खरेदी केली. त्यानंतर गुरुजींनी 'भावना बुटी तैला' नावाचे दुसरे औषध सांगितले, ज्याची किंमत ७६,००० रुपये प्रति ग्रॅम होती. या तेलाच्या १५ ग्रॅम मात्रेसाठी इंजिनिअरला पत्नी आणि कुटुंबाकडून उधार घ्यावे लागले. त्यांनी जवळपास १७ लाख रुपये खर्च करून हे तेल घेतले.
तिसरे औषध आणि बँक कर्ज
'देवरज रस बुटी' नावाचे तिसरे अत्यावश्यक औषध घेण्यासाठी गुरुजींनी दबाव टाकला. याची किंमत २.६ लाख रुपये प्रति ग्रॅम सांगण्यात आली. या औषधासाठी इंजिनिअरला बँकेतून २० लाखांचे कर्ज घ्यावे लागले आणि मित्रांकडूनही उसने घेऊन त्यांनी जवळपास १० लाख रुपये खर्च करून हे औषध विकत घेतले. अशा प्रकारे, या इंजिनिअरने उपचाराच्या नावाखाली तब्बल ४८ लाखांहून अधिक रक्कम गमावली.
आरोग्य बिघडले, किडनी झाली निकामी!
इतकी महागडी औषधे घेऊनही इंजिनिअरच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. उलटपक्षी, काही दिवसांनी तपासणीत त्यांना त्यांची किडनी खराब होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या मते, हे नुकसान बाबाने दिलेल्या औषधांमुळेच झाले असण्याची शक्यता आहे.
जेव्हा पीडित इंजिनिअरने बाबाकडे तक्रार करण्याची हिंमत केली, तेव्हा त्याने उपचार सोडल्यास प्रकृती अधिक बिघडेल, असे म्हणत घाबरवले. अखेरीस, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडिताने ज्ञानभारती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
मुख्य आरोपी फरार
या फसवणूक रॅकेटमध्ये विनय नावाचा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे, जो सध्या फरार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. हा संपूर्ण गट लोकांच्या खासगी समस्यांचा आणि कमतरतांचा फायदा घेऊन लाखो रुपये उकळत असल्याचे तपासात स्पष्ट झाले
Web Summary : Bengaluru engineer defrauded of ₹48 lakhs by fake Baba promising cure for 'secret disease.' Bogus Ayurvedic medicine caused kidney failure. Police investigation underway, main accused absconding.
Web Summary : बेंगलुरु में एक इंजीनियर को 'गुप्त रोग' ठीक करने के नाम पर फर्जी बाबा ने 48 लाख रुपये ठगे। आयुर्वेदिक दवा से किडनी खराब। पुलिस जांच जारी, मुख्य आरोपी फरार।