शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीच 'त्याला' म्हणाला माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 11:27 IST

पुण्यातील एका महिलेवर हॉस्टेलमध्ये राहत असताना तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने जबरदस्ती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे: पुण्यातील एका महिलेवर हॉस्टेलमध्ये राहत असताना तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने जबरदस्ती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेने या संबंधित घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. मात्र पतीने मीच त्या कर्मचाऱ्याला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते असे उत्तर दिल्यानंतर पतील जबरदस्त धक्का बसला.

पत्नीच्या तक्रारीनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरेश शैशराज शिंदे (वय ३४, रा. हिलटॉप सोसायटी, धनकवडी) याला अटक केली आहे. तर या महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील एका होस्टेलवर नोव्हेंबर २०१९ मध्ये घडली होती. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला आपल्या पतीसमवेत होस्टेलवर रहात होती. या होस्टेलमधील सुरेश शिंदे याने या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. ही बाब तिने आपल्या पतीला सांगितली. तेव्हा त्याने आपणच सुरेश शिंदे याला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे उत्तर दिले. त्याच्या उत्तराने पत्नीला धक्का बसला. शेवटी तिने नातेवाईकांशी बोलल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिसांनी सुरेश शिंदे व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन शिंदे याला अटक केली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकPuneपुणे