शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

धक्कादायक! एक्सप्रेस ट्रेनमध्ये HIV ग्रस्त महिलेवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 17:09 IST

ही घटना सोमवारी रात्री पटना-भभुआ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये घडली.

ठळक मुद्देपोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडल्याचे कळताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांपैकी एकाला पकडण्यात जवानांना यश आले. बीरेंद्र प्रकाश सिंग (२६) आणि दीपक सिंग (२८) अशी या दोन आरोपींची नावे आहेत.या महिलेला HIVची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.

सासाराम (रोहतास) -  बिहारमधील कैमूर जिल्यातील भभुआ रोड स्टेशनवर आलेल्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका HIV ग्रस्त विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.२२ वर्षीय HIV ग्रस्त महिलेवर एक्सप्रेस गाडीच्या डब्यात दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना सोमवारी रात्री पटना-भभुआ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये घडली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बीरेंद्र प्रकाश सिंग (२६) आणि दीपक सिंग (२८) अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

पटना-भभुआ  इंटरसिटी एक्सप्रेस सोमवारी रात्री ११.५० वाजताच्यासुमारास भभुआ रोड स्थानकात पोहोचल्यानंतर डब्यांची पाहणी करत असताना आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांना हा लैंगिक अत्याचार सुरू असल्याचे पहिले. या महिलेला अडवून धरलेल्या या दोन आरोपींना पोलिसांनी डब्यातच ताब्यात घेतले. दोन आरोपींपैकी एक आरोपी या महिलेवर बलात्कार करत होता. तसेच दुसरा आरोपी या लैंगिक अत्याचाराचे शूटिंग करत होता, अशी खळबळजनक माहिती जीआरपीच्या जवानांनी दिली. पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडल्याचे कळताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांपैकी एकाला पकडण्यात जवानांना यश आले. काही वेळाने दुसऱ्या आरोपीच्या मुसक्याही आवळण्यात आल्या. अत्याचार झाले तेव्हा ही महिला डब्यात एकटीच होती, असे अधिकारी म्हणाला. या एक्सप्रेसचे भभुआ रोड हे शेवटचे स्थानक आहे. ही गाडी पटण्याहून संध्याकाळी ५.४५ वाजता सुटते.ही पीडित महिला वैद्यकीय तपासणीकरून पटण्याहून घरी परतत होती. त्यावेळी हे दोन आरोपी कुद्रा रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये चढले. हे स्थानक भभुआ स्थानकाआधी येते. बीरेंद्र प्रकाश सिंग (२६) आणि दीपक सिंग (२८) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनीही पोलिसांपुढे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली.

पीडित महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी भभुआ सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पीडित महिलेला तिच्या नवऱ्याने सोडून दिले होते. काही काळानंतर तिच्या पतीचे HIV या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेला HIVची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर या महिलेवर उपचार सुरू करण्यात आले, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारBiharबिहारPoliceपोलिसrailwayरेल्वेArrestअटकHIV-AIDSएड्स