शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! "भाई "ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 13:21 IST

Yerwada jail : अशा घटनांमुळे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडून कठोर उपाययोजना होणे आवश्यक आहे.

येरवडा - "भाई "ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. 

खून - मारामारी अशा गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आकाश कंचिले याच्या वाढदिवसानिमित्त येरवडा जेल बाहेर त्याच्या समर्थकांनी  फटाक्याची आतषबाजी केली. एवढ्यावरच न थांबता या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या घटनेमुळे परिसरातील भाईंच्या टोळ्यांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. येरवड्यातील गुन्हेगारी टोळ्यांची वाढती संख्या, त्यामुळे परिसरात गुन्हेगारी यावर पोलिसांनी अंकुश ठेवणे आवश्यक आहे. आकाश कंचिले  याच्यावर खून मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊन काळात येरवडा जेल मधून सुटलेल्या नितीन कसबे याचा शादल बाबा चौकात अवघ्या काही तासात आकाश कंचीले व त्याच्या टोळीतील सदस्यांनी अत्यंत निर्घृणपणे खून केला होता. या खूनाच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून तो या गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये आहे. येरवडा परिसरात असणारे त्याचे समर्थक यांची अजूनही दहशत आहे. शुक्रवार पाच फेब्रुवारी रोजी त्याचा वाढदिवस होता.  त्याच्या समर्थकांनी येरवडा जेल बाहेरील एअरपोर्ट रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी केल्याचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडिया वरून वायरल केला आहे. एवढेच नाही तर "किंग ऑफ येरवडा" असे इतर व्हिडिओ देखील तयार करून  वायरल करण्यात आलेले आहेत.  एकंदरीतच या भाई समर्थकांना कोणाची भीती राहिलेली नाही. आपल्या टोळ्यांचे वर्चस्व दाखवण्यासाठी गुन्हेगार  व त्यांचे समर्थक अशाप्रकारे सोशल मीडियाचा सर्रासपणे वापर करत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीच्या वातावरणात खाली वावरत आहेत. अशा घटनांमुळे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडून कठोर उपाययोजना होणे आवश्यक आहे.

टॅग्स :jailतुरुंगyerwada jailयेरवडा जेलYerwadaयेरवडाPoliceपोलिस