शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

धक्कादायक Video! सातारा बसस्थानकात शिवशाहीच्या पाच बस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 18:54 IST

Satara Shivshahi bus fire: सातारा बससस्थानकामध्ये शिवशाहीच्या पाच बस सातारा शहर बसस्थानकाच्या समोर उभ्या करण्यात आल्या होत्या.  सायंकाळी पाच च्या सुमारास एका बसला अचानक आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा: येथील बसस्थानकामध्ये शेजारीशेजारी उभ्या असलेल्या शिवशाहीच्या एका बसला अचानक आग लागली. त्यानंतर ही आग पेटत जावून पाचही गाड्यांना त्याची झळ पोहोचली. यात पाचही गाड्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (Fire broke out at Five Shivshahi buses  Satara bus stand)

सातारा बससस्थानकामध्ये शिवशाहीच्या पाच बस सातारा शहर बसस्थानकाच्या समोर उभ्या करण्यात आल्या होत्या.  सायंकाळी पाच च्या सुमारास एका बसला अचानक आग लागली. ही आग लागल्याचे समजाताच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी धावत गेले. या कर्मचार्‍यांनी  अग्निशामक दल आणि हॉटेलमधील कर्मचार्‍यांना माहिती देवून पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच शेजारी-शेजारी उभ्या असलेल्या पाच ही बसेसनी पेट घेतला. त्यामुळे बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली. 

पंधरा मिनिटानंतर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या बसस्थानकात दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशामक दलाने पाण्याचे फवारे मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत पाचही गाड्या अक्षरक्षः जळून खाक झाल्या होत्या. पोलिसांनी ही आग कशी लागली यासाठी आजूबाजूचे हॉटैल आणि प्रवाशांकडे चौकशी सुरू केली. परंतु, अद्यापही या आगीचे नेमके कारण ना पोलिसांना समजले ना अधिकार्‍यांना.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगShivshahiशिवशाही