धक्कादायक! प्रेम विवाह केल्याचे न आवडल्याने पित्याचा मुलीवर अत्याचार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:37 IST2018-07-31T12:28:37+5:302018-07-31T12:37:49+5:30

प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून विवाहित मुलीला माहेरी नेऊन तिला झोपेच्या गोळ्या देऊन पित्यानेच अत्याचार केल्याची तक्रार एका पीडितेने सिडको पोलीस ठाण्यात केली आहे.

Shocking ! father's rape on daughter due to love marriage | धक्कादायक! प्रेम विवाह केल्याचे न आवडल्याने पित्याचा मुलीवर अत्याचार  

धक्कादायक! प्रेम विवाह केल्याचे न आवडल्याने पित्याचा मुलीवर अत्याचार  

ठळक मुद्दे ३७ वर्षीय पीडितेने २००६ साली प्रेमविवाह केला होता, तेव्हापासून ती औरंगाबादेतील खडकेश्वर येथे पतीसोबत राहते. पीडितेचा पे्रमविवाह तिच्या वडिलांना आवडला नव्हता. ते तिला बळजबरीने अमरावती येथील माहेरी घेऊन जात. अमरावती येथे जुलै २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत अत्याचार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

औरंगाबाद : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून विवाहित मुलीला माहेरी नेऊन तिला झोपेच्या गोळ्या देऊन पित्यानेच अत्याचार केल्याची तक्रार एका पीडितेने सिडको पोलीस ठाण्यात केली आहे. अमरावती येथे जुलै २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत अत्याचार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी अमरावती पोलिसांकडे वर्ग केला. 

याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, ३७ वर्षीय पीडितेने २००६ साली प्रेमविवाह केला होता, तेव्हापासून ती औरंगाबादेतील खडकेश्वर येथे पतीसोबत राहते. तिला दोन मुली आहेत. पीडितेचा पे्रमविवाह तिच्या वडिलांना आवडला नव्हता. ते तिला बळजबरीने अमरावती येथील माहेरी घेऊन जात. जुलै २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत पीडिता माहेरी असताना आरोपी वडिलांनी तिला झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यावर अत्याचार केले. याबाबत वाच्यता केल्यास तिला आणि तिच्या मुलींना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी त्यांनी दिल्याने पीडिता गप्प होती. एवढेच नव्हे, तर त्यांनी तिला तिच्या पतीविरोधात खोट्या तक्रारी करायला लावल्या. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडितेने पतीला ही बाब सांगितली. त्यानंतर २८ रोजी ते तिला आणि मुलींना अमरावती येथून औरंगाबादेत घेऊन आले. पीडितेने सिडको ठाणे गाठून अत्याचारी बापाविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही घटना अमरावती येथील असल्याने प्रकरण तपासासाठी अमरावती पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

Web Title: Shocking ! father's rape on daughter due to love marriage