शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

धक्कादायक! देशी दारूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 16:46 IST

Fatal Attack : या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देकल्याण Excise विभागाचे एकसाईज अधिकारी सुनील कणसे यांना चिंचपाडा परिसरात एका अल्टो कारमध्ये काही जण देशी दारू घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.

कल्याण - देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवल्याने Excise अधिकारी आणि त्यांच्या पथकावर Excise कार्यालयासमोरच प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कल्याणात समोर आली आहे. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.कल्याण Excise विभागाचे एकसाईज अधिकारी सुनील कणसे यांना चिंचपाडा परिसरात एका अल्टो कारमध्ये काही जण देशी दारू घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. सुनील कणसे यांच्या सह त्यांच्या पथकाने सदर परिसरात सापळा रचला. यावेळी एक कार आली या कारमध्ये देशी दारू सापडल्याने कारचालक दीपक पगारे याला ताब्यात घेऊन Excise पथक कल्याण पश्चिमेकडील आपल्या कार्यालयात पोहचले. कार्यलयासमोर आधी त्यांची गाडी अडवली आणि नंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवून तुम्हाला कारवाईसाठी आम्हीच भेटतो का असा सवाल करत काठी, लोखंडी सळीने Exciseच्या पथकावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सुनील कणसे यांच्यासह तीन कर्मचारी जखमी झाले. दरम्यान मारहाण करणाऱ्या टोळीतील काही जणांना पकडून Excise कर्मचाऱ्यांनी कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी राजेश चोळेकर, लहू म्हात्रे यांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत. 

 

SSR Case : मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल 

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागPoliceपोलिसliquor banदारूबंदीkalyanकल्याणArrestअटक