शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक..! पुण्यात रुग्णाला मिळाले ‘एक्सपायरी डेटेड’ रक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 21:51 IST

बारामती येथील योगेश लासुरे यांच्या पत्नीला स्तनाचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. लासुरे यांनी मंगळवार पेठेमधील ओम ब्लड बँकेतून रक्ताची पिशवी खरेदी केली.

ठळक मुद्देघडलेल्या प्रकाराबाबत लासुरे यांनी एफडीएकडे तक्रारएफडीएने रक्तपेढीला बजावली कारणे दाखवा नोटिस

पुणे : एक्स्पायरी डेट संपलेले रक्त एका रुग्णाला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. मंगळवार पेठे येथील ओम ब्लड बँकेने एका रग्णाला मुदत संपलेले रक्त दिले. डॉक्टरांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने पुढील अनर्थ टळला.ही घटना शुक्रवारी (19 आॅक्टोबर) घडली.  दरम्यान या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) तक्रार केली आहे. त्यानुसार एफडीएने रक्तपेढीला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.बारामती येथील योगेश लासुरे यांच्या पत्नीला स्तनाचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. लासुरे यांनी मंगळवार पेठेमधील ओम ब्लड बँकेतून रक्ताची पिशवी खरेदी केली. रक्ताची पिशवी घेऊन ते रुग्णालयात आले. डॉक्टरांनी पिशवी वरील एक्स्पायरी डेट पाहिल्यावर त्यांनी रुग्णाला ते रक्त देण्यास नकार दिला. रक्ताच्या पिशवीवर १० आॅक्टोबर २०१८ ही एक्सपायरी डेट होती. ही गोष्ट लक्षात येताच लासुरे यांनी तत्काळ ओम ब्लड बँकेशी संपर्क साधला. यावेळी चुकीने रक्ताच्या पिशवीवर पुढील महिन्याऐवजी या महिन्यातील 10 तारीख एक्स्पायरी डेट म्हणून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. घडलेल्या प्रकाराबाबत लासुरे यांनी एफडीएकडे तक्रार केली. या तक्रारीवरुन एफडीएने कारवाईला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे क्लेरिकल मिस्टेकमुळे हा प्रकार घडल्याचा दावा ओम ब्लड बँकेकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेBlood Bankरक्तपेढीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर