शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शेतकरी महिलेकडे 'या' नराधमाने शरीर सुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 20:14 IST

मोवाडा येथील घटना : इन्डस इन्ड बँक प्रतिनिधीचे कृत्य

ठळक मुद्दे पीडित महिलेने बुधवारी यवतमाळ गाठून पोलीस अधीक्षकांकडे आपली आपबिती कथन केली. आरोपी सूरज गजभिये याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) व ५०४ नुसार गुन्हा दाखल केला. 

घाटंजी (यवतमाळ ) : ट्रॅक्टरचे हप्ते थकले त्याच्या वसुलीचा बहाना करीत खासगी इन्डस इन्ड बँकेच्या प्रतिनिधीने आदिवासी शेतकरी महिलेला शरीर सुखाची मागणी केली. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजता घडली. धक्कादायक बाब म्हणजे घाटंजी पोलिसांनी या गुन्ह्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीडित महिलेने बुधवारी यवतमाळ गाठून पोलीस अधीक्षकांकडे आपली आपबिती कथन केली.

सुरज गजभिये असे त्या बँक प्रतिनिधीचे नाव आहे. तो सोमवारी तीन सहकार्यासह मोवाडा येथे गेला होता. आदिवासी शेतकरी महिलेने शेती कामाकरिता महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर इन्डस इन्ड बँकेच्या अर्थसहाय्याने खरेदी केला. या ट्रॅक्टरच्या कर्जाचे दोन हप्त्यांची परतफेड केली. शेतकरी महिलेचे पती मानसिक रुग्ण असल्याने शेतीसह संपूर्ण कारभार ही महिला पाहते. सोमवारी दुपारी थेट शेतात हे बँकेचे प्रतिनिधी पोहोचले. यावेळी शेतकरी महिलेने कापसाचे पैसे आल्यानंतर हप्त्याची परतफेड करतो असे सांगितले. नंतर बँक प्रतिनिधी सूरज गजभिये याचे साथीदार निघून गेले. त्यांना जाताजाता शेतकरी महिलेचा ट्रॅक्टर ओढून नेला.

शेतातून सदर महिला व सूरज गजभिये हे घरी परतले. तेव्हा ट्रॅक्टर नेल्याची माहिती या महिलेच्या मुलीने दिली. यावेळी सूरज गजभिये याने पाणी मागण्याच्या बहाण्याने त्या महिलेसोबत सलगी करीत शरीर सुखाची मागणी केली. महिलेने आरडाओरडा करताच त्या बँक प्रतिनिधीने पळ काढला. या घटनेची तक्रार देण्यासाठी महिला घाटंजी पोलीस ठाण्यात पोहोचली असता तेथील पोलिसांनी महिलेच्या सांगण्याप्रमाणे तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यानंतर आरोपी सूरज गजभिये याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) व ५०४ नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगYavatmalयवतमाळFarmerशेतकरीWomenमहिलाPoliceपोलिसbankबँक