Shocking! Daughter in law committed suicide after sexually assaulting her by father in-laws | धक्क्कादायक! सासऱ्याच्या लैंगिक छळाला कंटाळून सुनेनी केली आत्महत्या 
धक्क्कादायक! सासऱ्याच्या लैंगिक छळाला कंटाळून सुनेनी केली आत्महत्या 

ठळक मुद्देपीडितेचे २२ फेब्रुवारी २०१७ रोजी  यांचं लग्न झालं होतं.मृत पीडितेचे वडील नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर पैसे मिळाल्यानंतर सुनेचे सासू - सासरे तिच्याकडे १५ लाख मागत होते.लिफ्टमध्ये सुद्धा त्यांनी तिच्या पाठीवर हात फिरवून मानेवर चुंबन घेतल्याचे आम्हाला सांगितले होते.

मुंबई - मुलुंड येथे खळबळजनक घटना घडली आहे. सासऱ्याच्या लैंगिक छळाला कंटाळून २५ वर्षीय सुनेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. 

१५ जून रोजी पहाटे ४ ते ८.३० दरम्यान पतीसह सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून  सुनेने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. ३०६, ३०४ (ब), ४९८ (अ) आणि ३४ अन्वये पती, सासरा आणि सासू  यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत पीडितेच्या आईने पोलिसांना जबाब दिला असून त्या जबाबात तिने खळबळजनक माहिती दिली आहे. पीडितेचे २२ फेब्रुवारी २०१७ रोजी  यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस सुरळीत संसार सुरु होता. काही दिवसांनी सुनेला सासू - सासरे तू हिंदी मिडीयममधून शिकलेली आहे म्हणून तुला इंग्रजी येत नाही. तुला ड्रेसिंग सेन्स नाही, तुझी चॉईस चांगली नाही. त्याचप्रमाणे तू लहान गावातून आली असून काहीही समजत नाही अशा प्रकारे टोमणे मारून तिचा मानसिक छळ करत. फेब्रुवारी २०१८ साली मृत पीडितेचे वडील नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर पैसे मिळाल्यानंतर सुनेचे सासू - सासरे तिच्याकडे १५ लाख मागत होते. परंतु आम्ही पैसे देण्यास नकार दिला असे पीडितेच्या आईने जबाबात म्हटले आहे. तसेच सासरे हे नेहमी एकांताचा फायदा घेऊन सुनेकडे वाईट नजरेने पाहून लैंगिक चाळे करत. लिफ्टमध्ये सुद्धा त्यांनी तिच्या पाठीवर हात फिरवून मानेवर चुंबन घेतल्याचे आम्हाला सांगितले होते. तसेच किचनमध्ये एकटी काम करत असताना तिला मागून येऊन पकडणे अशा प्रकारे लैंगिक चाळे सासरे सुनेसोबत करत असे तिच्या आईने जबाबात म्हटले आहे. पीडितेच्या आत्महत्येच्या आधी तिच्यासोबत सासऱ्यांनी केलेला गैरप्रकार तिने पती आणि सासूला सांगितला. त्यावेळी सुनेवरच उलटे आरोप करून पती आणि सासूने जोरदार भांडण केले होते. झालेला सर्व प्रकार तिने आपल्या आईशी फोनवर सांगून तू लवकर मला घेऊन जायला ये अशी विनवणी आईला करत होती. 


Web Title: Shocking! Daughter in law committed suicide after sexually assaulting her by father in-laws
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.