शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

धक्कादायक! मुलीसह बँकेकडून कँन्सरग्रस्त आईची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 12:26 IST

लॉकरच्या बनावट चाव्या तयार करुन तसेच कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करीत बँक अकाउंट मधून पैसे काढून एका कँन्सरग्रस्त आईची मुलीसह बँकेने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देदोषींवर गुन्हे दाखल करण्याचे लष्कर पोलिसांना आदेश बनावट चाव्या, कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा केला वापर

पुणे : लॉकरच्या बनावट चाव्या तयार करुन तसेच कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करीत बँक अकाउंट मधून पैसे काढून एका कँन्सरग्रस्त आईची मुलीसह बँकेने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि युक्तिवादाच्या आधारावर न्यायालयानेपोलिसांना तपशीलवार तपास करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग कनिष्ठ  न्यायालयाने दिले आहेत.  जेनोबिया रुसी पटेल (वय ८५, रा,कन्टोमेंट) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची माहिती अँड. आशुतोष श्रीवास्तव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, जेनोबोया यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता. त्यांनी हडपसर भागात मालमत्ता खरेदी केली होती. मात्र आजारपणामुळे त्यांनी त्या जागेची विक्री केली. मिळालेली रक्कम त्यांनी पती रुसी पटेल हयात असताना संयुक्त खात्यात, शेअर्स, म्युच्युअल फंड, ठेवींच्या स्वरुपात ठेवली होती. जेनोबिया यांची काही वडिलोपार्जित मालमत्ताही होती. पतीचे २०१६ मध्ये निधन झाल्यानंतर मुलींनी आईच्या आजारपणाचा फायदा घेतला. त्यांनी जेनोबिया आणि त्यांच्या पतीच्या बनवट स्वाक्षऱ्या करुन मालमत्ता आणि अज्ञात व्यक्तींच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला आहे. जेनोबिया आपली व्यथा सांगताना म्हणाल्या, पती आणि मी कष्टाने मिळवलेली रक्कम मुलींनी वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करुन लॉकरमधून बनावट चावीच्या आधारे काढून घेतली. याबाबत बँकांच्या अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊनही त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष करुन आरोपींनी स्वत:च्या खात्यात रक्कम जमा केली. या फसवणुकीविषयी पोलिसांना अनेकदा तक्रार दिली. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. कुठलीच दाद न दिल्याने श्रीवास्तव यांच्यामार्फत जेनोबिया यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.   तक्रारदार पटेल या ८५ वर्षांच्या असून त्या कर्करोगाच्या रुग्ण आहेत. त्यांची जुबिन विवियन डिसुजा उर्फ जुबिन रुसी पटेल (मुलगी), रोमिना परवेझ खंबाटा, परवेज तालिब खंबाटा, योहान खंबाटा, क्रिस्टोफर लोझोडो, जसजीत सिंह निज्जर, सतीश सबनीस यांनी बँकेतील व्यवस्थापक, अधिकारी आणि अन्य आरोपीशी संगनमत करुन फ सवणूक केली असल्याची तक्रार जेनोबिया यांनी लष्कर भागातील न्यायालयाकडे केली. 

अप्रामाणिकपणे आणि बनावट कागदपत्रे तयार करुन तक्रारकर्त्यांनी स्वाक्षरी केल्याचे दाखविण्याच्या हेतूने आणि त्यातून गैरमार्गाने लाभ मिळविण्याकरिता त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. अशाप्रकारे त्यांनी तक्रारदार आणि सरकारची फसवणूक केली आहे. आणि सत्य म्हणून घोषित करण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरुन तक्रारदारांना आर्थिक आणि मानसिक त्रास दिला असल्याचे अ‍ॅड. श्रीवास्तव यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीbankबँकPoliceपोलिसCourtन्यायालय