शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:14 IST

हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह जाळून राख यमुना नदीत फेकण्यात आली.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एका अत्यंत धक्कादायक 'ऑनर किलिंग'ची घटना समोर आली आहे. वेगळ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध ठेवल्याने २१ वर्षीय शिवानी कश्यपची तिच्याच कुटुंबाने गळा दाबून हत्या केली. एवढेच नाही, तर हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह जाळून राख यमुना नदीत फेकण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी शिवानीचे वडील आणि आईला अटक केली असून, भाऊ आणि मावशीची मुलगी फरार आहेत.

प्रेमसंबंधातून वादाची ठिणगी

बारात कोतवाली परिसरातील लुहारी गावात राहणारी शिवानी कश्यप अंकित प्रजापती नावाच्या मुलावर प्रेम करत होती, जो दुसऱ्या जातीचा होता. यावरून शिवानी आणि तिच्या कुटुंबात अनेकदा वाद होत असत. समाजात आणि गावात कुटुंबाची 'बदनामी' होऊ नये, या भीतीने कुटुंबीयांनी शिवानीच्या प्रेमाला विरोध केला होता.

मंगळवारी रात्री घडला थरार

पोलिसांना दिलेल्या जबाबात शिवानीचे वडील संजीव उर्फ ​​संजू यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री शिवानीने कुटुंबाला सांगितले की ती अंकितसोबत कोर्ट मॅरेज करणार आहे. यावर कुटुंबीयांचा पारा चढला. यावेळी त्यांनी शिवानीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, ती आरडाओरडा करू लागल्याने वडील, आई बबिता, भाऊ रवी आणि मावशीच्या मुलीने तिचा गळा दाबून खून केला.

मृतदेहाची निर्दयीपणे विल्हेवाट

हत्येनंतर कुटुंबाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एक भयानक योजना आखली. रात्रीच शिवानीचा मृतदेह घराबाहेर नेऊन जाळण्यात आला आणि तिची राख यमुना नदीत फेकून देण्यात आली, जेणेकरून कोणताही पुरावा मागे राहणार नाही.

प्रियकराने उघड केले गुपित

बुधवारी सकाळी जेव्हा अंकित प्रजापतीला शिवानी बेपत्ता झाल्याचे कळले आणि त्याला काहीतरी वाईट घडले असावे असा संशय आला, तेव्हा त्याने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि शिवानीच्या कुटुंबाची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. अंकितच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

सतत नजरकैद आणि मारहाण

पोलीस तपासात असेही समोर आले आहे की, शिवानीच्या प्रत्येक हालचालीवर कुटुंबाची करडी नजर होती. तिला घराबाहेर जाण्यापासून रोखले जात होते आणि अंकितशी बोलल्यास तिला मारहाण केली जात होती. तरीही शिवानी आपल्या निर्णयावर ठाम होती आणि अंकितशी लग्न करू इच्छित होती. तिने अनेकदा पळून जाऊन कोर्ट मॅरेज करण्याची धमकी दिली होती.

फरार आरोपींचा शोध सुरू

एसपी सूरज कुमार राय यांनी माहिती दिली की, अटक केलेल्या वडील संजीव आणि आई बबिता यांच्यासह फरार भाऊ रवी आणि मावशीच्या मुलीविरुद्ध खून, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल आणि उर्वरित आरोपींना लवकरच पकडण्यासाठी पोलिसांची पथके छापे टाकत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू