शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! जमिनीच्या वादातून चुलत भावाला ट्रॅक्टरखाली चिरडले; जुन्नरमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 15:20 IST

जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाच्या अंगावर भर चौकात ट्रॅक्टर घालून त्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  

पुणे: पैसे, जमीन, मालमत्ता यांच्यापुढे माणूस रक्ताच्या नात्यांना देखील संपवायला मागे पुढे पाहत नाही. याचाच ज्वलंत अनुभव देणारी आणि क्रूरतेची परिसीमा गाठणारी घटना जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे घडली. जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाच्या अंगावर भर चौकात ट्रॅक्टर घालून त्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यात गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

या घटनेत प्रकाश नामदेव मनसुख (वय-५८) असे  मृत्यू ;झालेल्या भावाचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जयनाथ सोपान मनसुख याला अटक करत त्याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील जयेश सोपान मनसुख ( वय ४०) हा शेती व ट्रॅक्टरचा व्यवसाय करतो.त्याचा चुलतभाऊ प्रकाश नामदेव मनसुख (वय ५८ )हे व्यवसायानिमित्त मुंबई व गावी असतात. या दोन चुलत भावांमध्ये शेतीच्या शेती वरून वाद होते. सोमवारी( दि.२ ) सायंकाळी सावरगाव जवळच्या एकनाथवाडी येथील मुख्य चौकात जयेश व प्रकाश समोरासमोर आले. त्याचवेळी जयेशने प्रकाश यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. जखमी अवस्थेत प्रकाश यांना सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले .परंतु प्रकाश याची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. या दरम्यान मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. 

जुन्नरचे पोलीस व तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Junnarजुन्नरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMurderखून