शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मैत्रीण बोलली नसल्याने युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:55 IST

राजारामपुरीतील घटना : बारावीच्या पेपरनंतर कृत्य 

ठळक मुद्देमाहिती व तंत्रज्ञान विषयाचा बारावीचा शेवटचा पेपर देवून आलेनंतर श्रीरामने आपले जिवन संपवून घेतल्याचा धक्का त्याच्या कुटूूंबियांना बसला आहे.. सहा महिन्यापासून दोघे बहिण-भाऊ माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या राजारामपूरी पाचवी गल्ली येथील पंचशिल अपार्टमेंन्टमधील फलॅटमध्ये भाड्याने राहत होते.

कोल्हापूर - मैत्रीण बोलत नसल्याच्या नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्यांने राहत्या फलॅटमध्ये गफळास घेवून आत्महत्या केल्याची ºहदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. श्रीराम संजय कोळी (वय १७, रा. गोंदवले, ता. मान, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. माहिती व तंत्रज्ञान विषयाचा बारावीचा शेवटचा पेपर देवून आलेनंतर श्रीरामने आपले जिवन संपवून घेतल्याचा धक्का त्याच्या कुटूूंबियांना बसला आहे. त्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

पोलीसांनी सांगितले, श्रीराम कोळी हा चाटे स्कुलमध्ये बारावीमध्ये शिकत होता. त्याची बहिण तेजश्री बी. ई. मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. ती कोल्हापूरातच खासगी कंपनीत नोकरी करते. सहा महिन्यापासून दोघे बहिण-भाऊ माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या राजारामपूरी पाचवी गल्ली येथील पंचशिल अपार्टमेंन्टमधील फलॅटमध्ये भाड्याने राहत होते. श्रीरामची बारावीची परिक्षा सुरु आहे. तो हुशार होता. मंगळवारी त्याचा शेवटचा माहिती व तंत्रज्ञान विषयाचा पेपर होता. सकाळी बहिणीकडून तीनशे रुपये घेवून तो पेपरला गेला. जाताना त्याच्या चेहºयावर कुठलाही तणाव किंवा नैराश्य नव्हते. दूपारी पेपरहून आलेनंतर तीनच्या सुमारास बहिणीने त्याला फोन करुन पेपर कसा गेला याची विचापूस केली. त्याने चांगला गेला असे सांगुन फोन ठेवला. बहिण तेजश्रीने तो असे काही करुन घेईल असे स्वप्नातही पाहिले नव्हते. सायंकाळी पाचच्या सुमारास ती घरी आली. दरवाजा आतून बंद होता. तिने श्रीरामला हाक दिली, परंतू आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता श्रीराम सिलींग फॅनला उटकत असल्याचे दिसून आले. हे दूष्य पाहून ती जागेवरच कोसळली. आरडाओरड करु लागल्याने आजूबाजूचे रहिवाशी आले. येथील काही तरुणांनी दरवाजा मोडून काढला असता श्रीरामने गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकाराची वर्दी राजारामपूरी पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठविला. श्रीरामने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलीसांना मिळून आली. भावाच्या विरहाने अक्रोश करणाºया तेजश्रीला माजी महापौर माळवी यांनी धीर दिला. 

श्रीरामचे वडील डॉक्टर आहेत. आई गृहीणी आहे. मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी बहिणीसोबत त्याला कोल्हापूरला पाठविले होते. त्याचा सर्वजण लाड खूप करीत. तो हुशारही होता. त्याच्या आत्महत्येची माहिती समजताच आई-वडीलांना मानसिक धक्का बसला. नातेवाईकांसोबत ते कोल्हापूरला येण्यासाठी निघाले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीPoliceपोलिस