शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भाजपाच्या पदाधिकाऱ्याने शस्त्रे घेतली होती क्रॉफर्ड मार्केटमधून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 15:55 IST

मालेगाव स्फोटाचे डोंबिवली कनेक्शन असे बोलले गेले होते. आता डोंबिवलीतील शस्त्रांच्या दुकानाचे कनेक्शन कोणाशी व कुलकर्णीचा जहाल हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध काय, असा सवाल केला जात आहे.

ठळक मुद्देडोंबिवलीत भाजपाने अखिल भारतीय शस्त्र प्रदर्शन आयोजित केले होते का, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आनंदी आनंद गडे, शस्त्रेच शस्त्रे चोहीकडे, अशी काव्यात्मक टीका सोशल मीडियावर दिसून आली.काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व त्याने ही शस्त्रे कोणाकडून घेतली आणि कोणाला विकली, कुलकर्णी याचा सूत्रधार कोण, याचाही छडा लावला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

डोंबिवलीडोंबिवलीत येथे कुलकर्णीकडे सापडलेली शस्त्रे नेमकी कोठून आणली गेली याबाबत अनेक तर्कविर्तक लावले जात होते़ मात्र ही शस्त्रे क्रॉफर्ड मार्केटमधून आणल्याची कबुली कुलकर्णी याने पोलिसांना दिली आहे.कारवाईबाबत भाजपाचे मौनभाजपाचे पदाधिकारी शशिकांत कांबळे यांच्याकडे याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कुलकर्णी हे भाजपाचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांच्या या प्रकरणाविषयी अधिक माहिती नाही. त्याच्याविरोधात काय कारवाई करणार, या प्रश्नावरही मात्र भाजपाने मौन बाळगले आहे.सोशल मीडियावर भाजपा लक्ष्यमनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कुलकर्णीच्या कृत्याने डोंबिवलीची चाल, चित्र आणि चेहरा भाजपाने बिघडवला, अशी टीका केली. डोंबिवलीत भाजपाने अखिल भारतीय शस्त्र प्रदर्शन आयोजित केले होते का, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आनंदी आनंद गडे, शस्त्रेच शस्त्रे चोहीकडे, अशी काव्यात्मक टीका सोशल मीडियावर दिसून आली.भाजपाला दंगल घडवायची होती का?भाजपाच्या डोंबिवली शहर उपाध्यक्षाला शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी अटक केल्याने या हत्यारांचा वापर करून भाजपाला दंगली घडवायच्या होत्या का, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व त्याने ही शस्त्रे कोणाकडून घेतली आणि कोणाला विकली, कुलकर्णी याचा सूत्रधार कोण, याचाही छडा लावला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अर्बन नक्षलवादी हिणवणारेच निघाले सबर्बन नक्षली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर टीका करताना काही दिवसांपूर्वी म्हटले होेते की, २०१९ सालच्या निवडणुकीपूर्वी भाजपाला दंगली घडवून सत्तेवर यायचे आहे. तोच धागा पकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. कल्याण पूर्वेत राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन संकल्पयात्रा पार पडली. यावेळी सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भीमा कोरेगावची दंगल कोणी घडवली, असा प्रश्न केला होता.काही वर्षांपूर्वी मालेगाव येथील बॉम्बस्फोटप्रकरणी डोंबिवलीच्या एका तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. तेव्हा मालेगाव स्फोटाचे डोंबिवली कनेक्शन असे बोलले गेले होते. आता डोंबिवलीतील शस्त्रांच्या दुकानाचे कनेक्शन कोणाशी व कुलकर्णीचा जहाल हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध काय, असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस