Shocking! Attempt of self-immolation of 'that' couple outside the assembly | धक्कादायक! विधानसभेबाहेर 'त्या' दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

धक्कादायक! विधानसभेबाहेर 'त्या' दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

ठळक मुद्देनयागड जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आज सभागृहाच्या मुख्य गेटसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

भुवनेश्वर - ओडिशा विधानसभेबाहेर दाम्पत्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे नेले. जुलै महिन्यात त्यांच्या ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नाही, असे या महिलेचे आणि तिच्या पतीचे म्हणणे आहे. सध्या राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे.

 

आज ओडिशा विधानसभेच्या (ओएलए) बाहेर हाय व्होल्टेज ड्रामा घडवून आणण्यात आला आहे. नयागड जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आज सभागृहाच्या मुख्य गेटसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याने स्वतःवर रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता विधानसभेबाहेर तैनात पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रॉकेलची बाटली आणि एक मॅचबॉक्स जप्त केली. नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.


यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी ओडिशा विधानसभेसमोर याच जिल्ह्यातील एका युवकाने त्याच्या आईला चाकूने ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी थोड्या वेळाने या दोघांना ताब्यात घेतले होते आणि दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

 

Web Title: Shocking! Attempt of self-immolation of 'that' couple outside the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.