शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:20 IST

या मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, तिच्या पायात जोडवी आणि भांगात सिंदूर असल्याने ती विवाहित असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गाझियाबादच्या लोणी बॉर्डर परिसरातील शिव वाटिकाजवळच्या एका कालव्याजवळ एका सुटकेसमध्ये सुमारे २६ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा खून अन्यत्र करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह येथे आणून टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक नागरिकांनी या परिसरातील कालव्याच्या काठावर एक बेवारस हिरव्या रंगाची सुटकेस पाहिली. त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ लोणी बॉर्डर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सुटकेस उघडल्यावर त्यांना आतमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेची मान पूर्णपणे मोडलेली होती आणि तिच्या नाक व तोंडातून रक्त वाहत होते, ज्यामुळे तिला अमानुष मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसत होते.

ओळख पटवण्याचे आव्हान आणि बलात्काराचा संशयया मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, तिच्या पायात जोडवी आणि भांगात सिंदूर असल्याने ती विवाहित असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, प्रथमदर्शनी हा बलात्कार करून खून केल्याचा प्रकार वाटत आहे. शवविच्छेदनानंतरच यामागील सत्य समोर येईल.

फॉरेन्सिक टीमने आवश्यक नमुने केले गोळा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले. फॉरेन्सिक टीमने आवश्यक नमुने गोळा केले आहेत. एसएपी अजय कुमार सिंह यांनी माहिती दिली की, नियंत्रण कक्षाकडून बेहटा हाजीपूरहून बांधल्या जाणाऱ्या कालव्याच्या रस्त्याच्या कडेला सुटकेसमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती.

पोलीस आता आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, जेणेकरून मृतदेह कोणी आणला आणि सुटकेसमध्ये कोणी टाकला याचा शोध घेता येईल. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश