शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

गोरक्षकांचे हादरवून टाकणारे कृत्य; पाठलाग करून विद्यार्थ्याला घातल्या गोळ्या, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 12:17 IST

Student Shot Dead by cow vigilante : एका परप्रांतीय मजुराची गोरक्षकांनी हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता एका विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Cow vigilante violence in India : दिल्ली-आगरा महामार्गावर तब्बल १० किमी पाठलाग करत कथित गोरक्षकांनी एका विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या केली. गो-तस्कर असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी बारावीमध्ये शिकत असलेल्या आर्यन मिश्राची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये एक परप्रांतीय मजुराची गोमांस खाल्ल्याच्या संशयातून कथित गोरक्षकांनी हत्या केली होती. (A Class 12 student was allegedly chased in a car and killed by cow vigilantes in Haryana) 

हत्या करणाऱ्यांची नावे काय?

आर्यन मिश्राच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, अनिल कौशिक, वरूण, कृष्णा, आदेश आणि सौरक्ष अशी या आरोपींची नावे आहेत. अनिल कौशिक लिव्ह फॉर नेशन नावाची एक संस्था चालवतो. सध्या गुन्हे शाखा पोलीस या चौघांची चौकशी करत आहेत. 

आर्यन मिश्राच्या हत्येआधी काय घडले?

पोलिसांनी केलेल्या चौकशीतून गो-तस्करीच्या संशयातून आर्यन मिश्राची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. आरोपी अनिल कौशिकने पोलिसांना सांगितले की, फॉर्च्युनर आणि डस्टर गाडीतून गो-तस्कर येतात आणि रेकी करतात. त्यानंतर ट्रकमध्ये गोवंश घेऊन जातात.

२३ ऑगस्टच्या रात्री आरोपी गो-तस्करांच्या मागावर होते. स्विफ्ट कारमधून फिरत असताना त्यांना डस्टर गाडी दिसली. गाडीमध्ये गो-तस्कर आहेत, असे त्यांना वाटले आणि त्यांनी जवळ जाऊन गाडी थांबवण्याचा इशारा केला. 

मात्र, डस्टर गाडी चालवत असलेल्या तरुणाने वेग वाढवला. त्यामुळे आरोपींना वाटले की हेच गो-तस्कर आहेत. त्यानंतर त्यांनी डस्टर गाडीवर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. डस्टर कार दिल्ली आग्रा महामार्गावरील गदपुरी टोलनाका पार करून पुढे गेली. 

आर्यन मिश्रासोबत डस्टरमध्ये कोण होते? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डस्टर कारमध्ये आर्यन, त्याचा मित्र शांकी, हर्षित आणि त्याची आई व एक महिला होती. शांकीचा भाऊ कार चालवत होता, तर आर्यन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेला होता. पाठिमागे शांकी आणि दोन महिला होत्या. 

शांकीविरोधात हत्येसह इतर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेताहेत. कथित गोरक्षकांनी जेव्हा त्यांना थांबण्याचा इशारा केला. तेव्हा शांकीला वाटले की स्विफ्ट कारमध्ये पोलीस आहेत.  त्यामुळे शांकीने त्याच्या भावाला गाडी वेगात चालवण्यास सांगितले. त्याचवेळी गोरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक गोळी आर्यनला लागली. त्यानंतर त्यांनी कार थांबवली. 

आरोपी डस्टर कारजवळ आले. त्यांनी आत बघितले आणि आर्यनच्या छातीवर एक गोळी झाडली. त्यानंतर आर्यनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमध्ये महिला असल्याचे बघितल्यानंतर आरोपी पळून गेले. त्यांना पोलिसांनी नंतर अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारHaryanaहरयाणाPoliceपोलिसdelhiदिल्ली