शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shivling Theft: शिवमंदिरातून चोरांनी शिवलिंग चोरलं, ऐन श्रावण महिन्यात भाविक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 22:23 IST

पोलिसांनी या चोरीमागे एक वेगळंच कारण सांगितलंय

Shivling Theft: श्रावणाच्या पवित्र महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते. तसेच, शिवलिंगाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होण्यास काही दिवस असले तरी उत्तरेकडील राज्यांत श्रावण महिना सुरू झाला आहे. अशा पवित्र महिन्या दरम्यान उत्तर प्रदेशातील ललितपूर मध्ये एक विचित्र घटना घडल्याचे दिसले. ललितपूर येथील शिवमंदिरातील शिवलिंग चोरट्यांनी पळवून नेले. ही घटना सोमवारी रात्री ललितपूरच्या जाखलौन शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवमंदिरातील शिवलिंग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. मंदिरात शिवलिंगाची तोडफोड करून आणि शिवलिंग उपटल्याच्या खुणाही सापडल्या आहेत. या प्रकरणी तक्रार नोंदवून पोलिसांनी चोरट्याला अटक करण्यास सुरुवात केली आहे.

जमिनीखाली दडलेल्या धनाच्या लोभापायी चोरी?

ललितपूर नगरचे पोलिस उपअधीक्षक (सीओ सिटी) फूलचंद यांनी मंगळवारी सांगितले की, सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी जाखलौन शहरातील शिव मंदिरातून शिवलिंग चोरले. त्यांनी सांगितले की, शिवमंदिर परिसरात जमिनीचे उत्खनन केल्याच्या खुणाही सापडल्या असून, त्यावरून असे दिसते की, जमिनीखाली दडलेल्या धनाच्या लोभापोटी ही चोरी केली असावी. अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याचे सीओ यांनी सांगितले.

गावातील लोकांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी भाविक पूजा करण्यासाठी मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांना मंदिरात शिवलिंग दिसले नाही. मंदिरातील शिवलिंग चोरीला गेल्याची माहिती त्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिना सुरू झाला असल्याने दररोज शेकडो भाविक मंदिरात जल अर्पण करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत हे शिवलिंग लवकरात लवकर शोधावे आणि पुनर्स्थापित करावे अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

शिवलिंगाची चोरी झाल्यानंतर गावात अपशकून घडल्याची चर्चाही जोरात सुरू आहे. श्रावण महिन्यात मंदिरातून शिवलिंग चोरीला जाणे हे अशुभ आहे असं गावातील लोक चर्चा करत आहेत. भगवान शंकराबद्दल काही गोष्टी गावात बोलल्या जात आहेत. पण अपशकून किंवा अशा कोणत्याही गोष्टींवर भाष्य न करता पोलीस मात्र या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसRobberyचोरी