शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीराव भोसले बँकेत आणखी ८० कोटींचा घोटाळा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 20:21 IST

बँकेवर आर्थिक व्यवहार करण्याचे निर्बंध घातल्यानंतरही बँकेने तब्बल २ कोटी १७ लाख रुपये काढले.

ठळक मुद्देगैरशिस्त पाहून रिझर्व्ह बँकेने बँकेवर लादले होते आर्थिक निर्बध

पुणे : एनपीए (अनुत्पादक कर्ज) दिसू नये, म्हणून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत तब्बल ८० कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट दिल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच बँकेवर आर्थिक व्यवहार करण्याचे निर्बंध घातल्यानंतरही बँकेने तब्बल २ कोटी १७ लाख रुपये काढले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसले,सूर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले यांना आर्थिक गुन्हे शाखेने २५ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली आहे. या चौघांना विशेष न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. भोसले हे बँकेचे अध्यक्ष, संचालक असताना, जाधव संचालक होते. तसेच पडवळ हे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शैलेश भोसले हे बँकेचे मुख्य हिशेब तपासनीस होते. त्या काळात ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, सध्या या चौघांकडे चौकशी करण्यात येत आहे़ आरोपींची बँक खाती, स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयी माहिती घेतली जात आहे. आरोपींनी या रक्कमेचा वापर कशाकरीता केला याची माहिती घेण्यात येत आहे. या बँकेच्या आणखी एका संचालकाचे नाव समोर आले आहे.बँक एनपीए दिसू नये, म्हणून बँकेने तब्बल ८० कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट दिले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या भावाला हे कॅश क्रेडिट देण्यात आले आहे. त्यासाठी २३ धनादेशांचा वापरकरण्यात आला होता. बँकेची आर्थिक गैरशिस्त पाहून रिझर्व्ह बँकेने ६ मे २०१९ रोजी आदेश काढून बँकेवर आर्थिक निर्बध लादले होते. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना केवळ १ हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती असे असताना या निर्बंधानंतर बँकेतून तब्बल २ कोटी १७ लाख रुपये काढण्यात आल्याचे आढळून असल्याचे कदमयांनी सांगितले.

..................................

लेखापरीक्षकांची होणार चौकशी

शिवाजीराव भोसले बँकेत इतकी अनियमितता असताना मागील लेखा परिक्षकांना ती कशी दिसून आली नाही़ त्यांनी त्याबाबत कोणत्या सूचना दिल्या होत्या. आर्थिक बाबींच्या अनियमिततेबाबत काही इशारा दिला होता का, याची माहिती घेतली जात असून या लेखा परिक्षकांची चौकशी करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीbankबँकPoliceपोलिस