शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदेंवर शिंदे गटाच्या महिलांकडून जीवघेणा हल्ला

By जितेंद्र कालेकर | Updated: April 4, 2023 02:13 IST2023-04-04T02:12:55+5:302023-04-04T02:13:15+5:30

हा जीवघेणा हल्ला 15 ते 20 महिलांच्या गटाने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना सोमवारी रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली. 

Shiv Sena Thackeray group roshni shinde was fatally attacked by a woman from the Shinde group | शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदेंवर शिंदे गटाच्या महिलांकडून जीवघेणा हल्ला

शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदेंवर शिंदे गटाच्या महिलांकडून जीवघेणा हल्ला

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा जीवघेणा हल्ला 15 ते 20 महिलांच्या गटाने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना सोमवारी रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली. 

कासरवडवली येथील रोशनी शिंदे यांच्या कार्यालयातून बाहेर पडण्याच्या वेळीच त्यांच्यावर शिंदे गटाच्या महिलांनी कार्यालयात शिरून हा हल्ला केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात कासरवाडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी  रोशनी शिंदे यांनी तक्रार अर्जही केला आहे. दरम्यान, रोशनी यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Shiv Sena Thackeray group roshni shinde was fatally attacked by a woman from the Shinde group