शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिरुर हादरले! आई स्वयंपाक करत होती, नराधम परप्रांतीयाचा सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 10:31 IST

शिरुर शहरात राहणारी एक महिला सायंकाळच्या सुमारास घरात स्वयंपाक करत असताना तिची सहा वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. तेव्हा हा प्रकार घडला.

मलठण : शिरुर शहरात एका परप्रांतीय युवकाने सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचे संतापजनक घटना घडली आहे. सदर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना या आरोपीला शिरुर पोलिसांच्या पथकाने काही तासात बेड्या ठोकत अटक केली. पाचू हादरा असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिरुर शहरात राहणारी एक महिला सायंकाळच्या सुमारास घरात स्वयंपाक करत असताना तिची सहा वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. दरम्यान, पाचू हादरा याने या चिमुरडीला बाजूच्या खोलीत घेऊन जात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यावेळी या चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तिची आई शेजारील घराकडे पळत गेली असता तिला आपल्या बालिकेवर पाचू हादरा अत्याचार करत असल्याने दिसले.

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन करा, वासनांध आणि विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना अतिशय निंदनीय आहे. हे अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शासन करा, अशी मागणी कुटुंबीय आणि महिला संघटनांकडून होत आहे. यावेळी बालिकेच्या आईने आरडओरडा केल्याने आरोपी पाचू पळून गेला.

याबाबत पिडीत बालिकेच्या आईने शिरुर पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केली. तर घटनेचे गांभीर्य लक्षात पोलिसांनी आरोपी परप्रांतिय असल्याने पळून जाऊ शकतो म्हणून तातडीने पोलिसांचे दोन पथक नेमून अहमदनगर व पुणे रेल्वे स्टेशन येथे रवाना केले. मात्र सदर ठिकाणी आरोपी आला नाही.

त्यानंतर सकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, पोलीस नाईक नाथा जगताप, संपत खबाले, पोलीस शिपाई रघुनाथ हळनोर, नितेश थोरात यांनी शिरुर शहरात शोध मोहीम राबवत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाचू हादरा (रा. शिरूर ता. शिरुर जि. पुणे) याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील करत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगShirurशिरुर