शिरपूर तालुका पोलिसांनी पकडला ६४ लाखांचा गुटखा, ट्रक चालकाला अटक
By अतुल जोशी | Updated: October 3, 2023 17:05 IST2023-10-03T17:05:03+5:302023-10-03T17:05:34+5:30
ही कारवाई मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर सोमवारी दुपारी केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

शिरपूर तालुका पोलिसांनी पकडला ६४ लाखांचा गुटखा, ट्रक चालकाला अटक
धुळे : इंदूरकडून शिरपूरकडे येणाऱ्या कंटेनरमधून पोलिसांनी ६४ लाख ३५ हजाराचा सुगंधित गुटखा व २५ लाखांचे वाहन असा एकूण ८९ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर सोमवारी दुपारी केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.
शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड तपासणी नाक्यावर सापळा लावला. त्यावेळी इंदूरकडून शिरपूरकडे येणाऱ्या कंटेनर (क्र. आरजे ११-जीसी२८०९) ची तपासणी केली असता, त्यात १५० गोण्यांमध्ये ६४ लाख ३५ हजाराचा गुटखा जप्त केला.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिंमतराव बाविस्कर यांनी शिरपूर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चालक अजित अमरसिंग (वय ३५, रा. नागला, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे करीत आहेत.