शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
2
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
3
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
4
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
5
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
6
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
7
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
8
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
9
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
10
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
11
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
12
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
13
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
14
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
15
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
16
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
17
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
18
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
19
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
20
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी

शीना बोरा या वर्षी श्रीनगरमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याला दिसली होती; इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:26 IST

Sheena Bora Case : इंद्राणीने सीबीआयला पत्र लिहून आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. तसे न झाल्यास मी न्यायालयात अर्ज करेन, असे इंद्राणीने सांगितले.

मुंबई - शीना बोरा हत्याकांडात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्राणीची वकील सना रईस खान यांनी दावा केला आहे की, सरकारी अधिकाऱ्याने शीना बोराला यावर्षी श्रीनगरमध्ये पाहिले होते. तिने तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला सांगितले की, ती २०२१ मध्ये श्रीनगरमध्ये शीनाला भेटली होती. इंद्राणीने सीबीआयला पत्र लिहून आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. तसे न झाल्यास मी न्यायालयात अर्ज करेन, असे इंद्राणीने सांगितले.

शीना बाेरा जिंवत असून ती काश्मीरमध्ये आहे, असा खळबळजनक दावा शीनाच्या हत्येत आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला दिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृहात नुकतीच आपली एका महिलेसोबत भेट झाली असून, ही महिला काश्मीरमध्ये शीना बोराला पाहिल्याचे सांगते, तिथे तिचा शोध  घ्यावा असे तिने पत्रात म्हटले आहे. कोण आहे शीना बोरा आणि तिची हत्या कधी झाली ?

शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी च्या पहिल्या पतीची मुलगी होती. जिची २४ एप्रिल २०१२ रोजी गळा आवळून हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता. २०१५ मध्ये ही बाब समोर आली होती. सावत्र भावासोबतचे प्रेमसंबंध आणि संपत्तीच्या वादातून शीना बोराची हत्या करण्यात आली होती. वास्तविक पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचे नाव राहुल आहे, ज्याच्यासोबत शीनाचे अफेअर होते. यामुळे इंद्राणी आणि पीटर दोघेही नाराज होते.खून कसा झाला?२०१२ मध्ये हे हत्याकांड घडवण्यात आले होते. शीना अभ्यासासाठी अमेरिकेला गेली आहे, असे दोन वर्षे सर्वांनाच वाटत राहिले. मात्र, २०१५ मध्ये पोलिसांना शीनाची हत्या झाल्याची माहिती मिळाली. इंद्राणी मुखर्जीने तिचा ड्रायव्हर श्याम मनोहर राय आणि अन्य एका व्यक्तीच्या मदतीने शीनाची हत्या केली होती.

 

* शीना इंद्राणीची मुलगी होती आणि मुंबईत घर मिळविण्यासाठी ब्लॅकमेल करत होती, असे  तपासात समोर आले. * शीना बोरा गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जी (पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा) याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. * राहुल आणि शीना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण राहुलला शीना पुढील आयुष्यासाठी विदेशात निघून गेल्याचे सांगण्यात आले.

* २०१५मध्ये हे प्रकरण उघडकीस आले. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठले  होते. 

* पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटविल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. 

* या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून  सीबीआयने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. गेल्यावर्षी त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.

 

 

टॅग्स :Sheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभागIndrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जी