शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन केली पतीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 20:19 IST

Murder Case : भिवंडीतील ओला कार चालकाच्या हत्येचा उलगडा

ठळक मुद्दे प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात मयत प्रभाकर याची पत्नी श्रुती प्रभाकर गंजी ( वर्ष ३२ रा. कणेरी ) व तिचा प्रियकर नितेश गोवर्धन वाला ( वय २८ वर्ष , रा.भादवड ) व मैत्रीण प्रिया सुहास निकम ( वय ३२ वर्ष , रा.वेताळपाडा )

नितिन पंडीत भिवंडी - मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना १ ऑगष्ट रोजी उघडकीस आली आहे . या घटनेनंतर पत्नीच्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . मात्र पोलीस तपासात खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरासोबत विवाह करण्यासाठी पती घटस्फोट देत नसल्याने त्या रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचून दोघा जणांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात मयत प्रभाकर याची पत्नी श्रुती प्रभाकर गंजी ( वर्ष ३२ रा. कणेरी ) व तिचा प्रियकर नितेश गोवर्धन वाला ( वय २८ वर्ष , रा.भादवड ) व मैत्रीण प्रिया सुहास निकम ( वय ३२ वर्ष , रा.वेताळपाडा ) असे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे असून हत्या करणारे दोघे जण फरार असून त्यांचा तपास नारपोली पोलीस करीत आहेत. मयत प्रभाकर व पत्नी श्रुती या दोघांचेही अनैतिक वैवाहिक संबंध असून त्यातून पत्नी श्रुती हिने प्रियकर नितेश वाला या सोबत विवाह करण्यासाठी आपल्या पती कडे घटस्फोटा साठी तगादा लावला होता मात्र पती प्रभाकर घटस्फोट देत नसल्याची माहिती तिने आपली मैत्रीण प्रिया निकम हिला दिली असता तिचा सुध्दा घटस्फोट झाला असल्याने तिने श्रुती हिला पतीची हत्या करून काटा काढण्याचा सल्ला दिला असता त्यासाठी आपल्या ओळखीचे दोन युवक असल्याचे सांगितले. त्यांनतर पत्नी श्रुती हिने स्वतः कडील दागिने गहाण ठेवून एक लाख रुपयांची सुपारी हत्या करणाऱ्या दोघा जणांना दिली व त्यानंतर पत्नी श्रुती प्रियकर नितेश मैत्रीण प्रिया यांनी  कट रचून हत्या करणाऱ्यांनी ३१ ऑगष्ट च्या रात्री मुंबई येथे जाण्यासाठी प्रभाकर यास मोबाईल करून रात्री दहा वाजता कार बुक केली , व त्यानंतर प्रवासात मानकोली येथे त्या दोघा मारेकऱ्यांनी गळा आवळून हत्या करून शव कार मध्येच ठेवून पसार झाले होते.        

या गुन्ह्याचा तपास नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा ठाणे हे एकत्रित करीत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात फिर्याद देणारी पत्नी श्रुती हीच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे तपासात उघड झाले आहे . या गुन्ह्यात पत्नी श्रुती, तिचा प्रियकर नितेश व मैत्रीण या तिघांना बुधवारी अटक केली असून या तिघांनाही न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . तर हत्या करणारे दोघे जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे .

 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकOlaओलाcarकार