शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राजाच्या रक्तानं माखलेलं जॅकेट फेकलं अन् आकाशला...; 'बेवफा' सोनमनं काय काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:03 IST

सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने राजा याच्या हत्या केली. ही हत्या सोनमच्या डोळ्यांसमोरच झाली.

इंदूरमधील प्रसिद्ध व्यापारी राजा रघुवंशी याच्या हत्याप्रकरणात चकित करणारे तपशील समोर आले आहेत. आधी बेपत्ता समजली जाणारी त्याची पत्नी सोनम हीच या थरारक हत्याकांडाची सूत्रधार निघाली आहे. सुरुवातीला पोलिसांना वाटत होते की, मेघालयमध्ये ट्रिपसाठी गेलेले राजा आणि सोनम दोघेही बेपत्ता झाले आहेत. मात्र, सोमवारी या प्रकरणाला नवे वळण मिळाले, जेव्हा राजा रघुवंशीचा मृतदेह एका खड्ड्यात आढळला. 

ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली आणि जंगलातील खड्ड्यात राजाचा मृतदेह सापडला. पोलीस तपासातून समोर आले की, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने राजा याच्या हत्या केली. ही हत्या सोनमच्या डोळ्यांसमोरच झाली.

खूनाचा कट आणि पुरावे

राजाची हत्या झाल्यानंतर आकाश नावाच्या मारेकऱ्याचे रक्ताने माखलेले जॅकेट घटनास्थळी काही अंतरावर आढळले. सुरुवातीला हे जॅकेट सोनमचे असल्याचा संशय पोलिसांना आला होता. मात्र तपासात स्पष्ट झाले की, हे जॅकेट आकाशचेच असून, तो राजाच्या हत्येत थेट सहभागी होता. हत्येनंतर आकाशने राजाच्या रक्ताने माखलेले ते जॅकेट तिथेच फेकून दिले. त्यावेळी सोनमने तिचे स्वतःचे जॅकेट त्याला घालायला दिले.

राजाला खड्ड्यात फेकून दिल्यानंतर सर्व आरोपींनी वेगवेगळ्या मार्गाने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. सोनम शिलाँगहून गुवाहाटीमार्गे इंदूरला परतली. तिचा प्रियकर राजने आधीच तिला लपण्यासाठी एक खोली तयार ठेवली होती.

तपासात धक्कादायक निष्कर्ष

मेघालयचे एसपी विवेक सीम यांनी म्हटले की, राजाचा मृतदेह सापडल्यानंतर केवळ सात दिवसांत पोलिसांनी पुरावे गोळा करून सोनमला अटक केली. हत्येच्या दिवशी तिचा सतत प्रियकर राज कुशवाहा आणि मारेकऱ्यांशी संपर्क होता. मात्र, अद्याप तिचा मोबाईल सापडलेला नाही.

सोनमने हत्येसाठी जंगल क्षेत्राची निवड कशी केली, याची चौकशी सुरू असून, तिने गुगलवर निर्जन जागेचा शोध घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पूर्व खासी हिल्स भागात दाट जंगलं असल्याने योजना राबवण्यासाठी ती जागा निवडली गेली.

खुनाचा उद्देश काय?

संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सोनमने केवळ काही दिवसांपूर्वी विवाह केलेल्या पतीची हत्या स्वतःच्या डोळ्यांसमोर करवून घेतली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी देखील मदत केली. तिच्या प्रियकराच्या मदतीने तिने गुन्ह्याचा संपूर्ण कट रचला आणि नंतर स्वतः गायब झाली. या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू