शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! राजधानी एक्सप्रेसमध्ये विद्यार्थिनींसोबत छेडछाड, लष्करातील जवानांचं घृनास्पद कृत्य; मद्यधुंद अवस्थेत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 20:17 IST

मिळालेल्या माहितीनुसार, दिब्रूगडहून नवी दिल्लीला जात असलेल्या 20505 राजधानी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत आर्मीच्या दोन जवानांनी छेडछाड केली आहे.

दिब्रूगडहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये शाळेतील विद्यार्थिनींसोबत छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडीच्या आरोपाखाली बिहारच्या छपरा रेल्वे पोलिसांनी लष्कराच्या दोन जवानांना अटक केली आहे. हे दोन्ही जवान मद्यधुंद अवस्थेत होते. हाजीपूर ते छपरा दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये हे अश्लील कृत्य झाल्याचे बोलले जात आहे. पीडित मुली उत्तर सिक्कीम येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिब्रूगडहून नवी दिल्लीला जात असलेल्या 20505 राजधानी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत आर्मीच्या दोन जवानांनी छेडछाड केली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. राजधानी एक्सप्रेसच्या कोच क्रमांक बी -11 मध्ये 8 विद्यार्थी प्रवास करत होते. यात यात विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी होता. याच वेळी आर्मी आणि आयटीबीपीच्या जवानांनी अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. अश्लिल व्हिडिओ पाहू लागले.

संबंधित विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर आरपीएफ आणि रेल्वे प्रशासन दोन्ही अॅक्शन मोडवर आले आणि दोन्ही आरोपी जवानांना छपरा जंक्शन येथून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या जवानांमध्ये जम्मू-काश्मीरमधील लष्कराचा जवान अमरजीत कुमार आणि पंजाबमधील आयटीबीपी जवान मुकेश कुमार यांचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध छपरा रेल्वे स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रेल्वे कोर्ट सोनपूर येथे रवानगी करण्यात आली आहे. यापूर्वी सदर रुग्णालयात दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता दोघेही मद्यधुंद अवस्थेत आढळून आले.

मोबाईलवर दाखवत होते, अश्लिल व्हिडिओ -ट्रेन हाजीपूर आणि छपरा दरम्यान असताना आर्मी आणि आयटीबीपीच्या जवानांनी विद्यार्थिनींना त्यांच्या मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली आणि अश्लील कृत्येही सुरू केले. यानंतर ट्रेनमधील टीटीईकडे तक्रार करण्यात आली. टीटीईने तत्काळ ट्रेनमधील आरपीएफ एस्कॉर्ट टीमला याची माहिती दिली. एस्कॉर्ट टीमच्या जवानांनी कंट्रोल रूमला यासंदर्भात माहिती दिली. 

सोनपूर कंट्रोलला माहिती मिळताच आरपीएफचे निरीक्षक मुकेश कुमारसिंह आणि रेल्वेचे एसएचओ राजेश कुमारसिंह हे आधीच छपरा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर टीमसह हजर होते. त्यांनी संबंधित दोन्ही आरोपी जवानांना अटक केली. दोघांच्याही वैद्यकीय तपासणीबरोबरच रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSoldierसैनिकMolestationविनयभंगPoliceपोलिस