शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
5
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
6
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
7
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
8
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
9
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
10
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
11
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
12
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
13
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
15
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
16
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
17
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
18
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
19
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

लज्जास्पद! अंध मुलीवर नातेवाइकानेच केला लैंगिक अत्याचार

By पूनम अपराज | Published: December 26, 2020 2:09 PM

Crime News : या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात मुलीची वहिनी, वहिनीचा भाऊ आणि त्याचा मित्र अशा तिघांविरोधात पॉक्सोसह भादंवि कलम ३७६(एल), ५०६, ५०४, ३२३, ३४  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएका सुनावणीदरम्यान आरोपींनी पुन्हा मुलीची वाट अडवून मुलीला २०१३ प्रमाणे आताही लैंगिक अत्याचार करण्याबाबत धमकावले होते.

मुंबईतील नागपाडा परिसरात एका अंध मुलीवर तिच्याच नातेवाईकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुटुंबातील कलहातून त्या नातेवाईकाने पुन्हा अत्याचार करण्याची धमकी दिली. नंतर पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या हतबल झाली होती. त्यावेळी मानसोपचार तज्ञांनी केलेल्या चौकशीत तिने सात वर्षापूर्वी नातेवाईकाने केलेल्या अत्याचाराची माहिती उघड झाली. ही माहिती मुलीच्या घरी दिल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात मुलीची वहिनी, वहिनीचा भाऊ आणि त्याचा मित्र अशा तिघांविरोधात पॉक्सोसह भा.दं.वि. कलम ३७६(एल), ५०६, ५०४, ३२३, ३४  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी न्यायालयात एका सुनावणीदरम्यान आरोपींनी पुन्हा मुलीची वाट अडवून मुलीला २०१३ प्रमाणे आताही लैंगिक अत्याचार करण्याबाबत धमकावले होते. इतकेच नव्हे तर दोघांनी मुलीच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन पीडित मुलगी स्वतःला मारून घेऊ लागली, स्वतःचे केस उपटू लागली, अशा प्रकारे स्वतःला इजा करून घेऊ लागली. कुटुंबियांनी अखेर मुलीला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले. त्यावेळी २०१३ मध्ये तिच्यावर वहिनीचा भाऊ व एका मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. 

 

त्यात तिच्या वहिनेनी देखील दोन आरोपींना मदत केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी तिला मारहाण करत धमकावल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी पीडित मुलीची वहिनी, तिचा भाऊ व भावाचा मित्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नागपाडा परिसरात पीडित मुलगी तिचे आई वडिल, भाऊ आणि बहिणीसोबत राहते. पीडित मुलगी अंध असल्यामुळे अर्थातच तिला कायम दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. २०१३ मध्ये पीडित मुलगी घरात एकटी असताना वहिनीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने तिच्यावर अतिप्रसंग केला होता. त्यावेळी पीडित मुलीचे वय १७ वर्ष होते. त्यावेळी दोघांनी मुलीला घडलेल्या प्रकाराची महिती कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घडलेला प्रकार पीडित मुलीने कोणाला सांगितला नाही. अशातच क्षुल्लक कारणांवरून मुलीचा भाऊ आणि वहिनीमध्ये वाद होत होते. हे वाद विकोपाला गेल्याने मुलीच्या वहिनीने मुलीच्या भावा विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तर आई-वडिलांविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यात तिघांना अटक झाल्यानंतर पीडित मुलगी घरी एकटीच असल्याने तिच्या वहिनीकडून तिला वारंवार मारहाण केली जात होती.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाMumbaiमुंबईPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण