शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप, आरोपींनी पीडितेला लुधियानाहून जबरदस्तीने आणले हरियाणाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 19:15 IST

Gangrape Case :पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र कुमार यांनी झिरो एफआयआर नोंदवला आणि मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला पोलिसांच्या देखरेखीखाली वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले.

हिसार -  हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात पंजाबमधील एका तरुणीवर चालत्या कारमध्ये ६ तरुणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 30 जानेवारी रोजी आझाद नगर पोलिस ठाण्यात मुलीने सांगितले की, आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिला बेशुद्ध करून पळून गेले. पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र कुमार यांनी झिरो एफआयआर नोंदवला आणि मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला पोलिसांच्या देखरेखीखाली वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले.

रक्ताने माखलेला मृतदेह जंगलात सापडला, लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडितेने सांगितले आहे की, ती तिच्या आत्याच्या मुलीसोबत राहायची. तिने तिला एका तरुणीशी भेटायला लावले. ती त्या मुलीला लुधियाना बसस्थानकावर घेऊन गेली आणि तिथे राकेश नावाच्या तरुणाने तिच्या भांगेत जबरदस्तीने सिंदूर भरले. त्यानंतर सर्वजण तिला गाडीत बसवून हिस्सारच्या दिशेने निघाले आणि वाटेत सर्व तरुणांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि नंतर तिला बेशुद्ध अवस्थेत हिसार सोडून पळ काढला.हिसारच्या आझाद नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र कुमार यांनी सांगितले की, पीडित मुलगी 30 जानेवारी 2021 रोजी पोलिस स्टेशनमध्ये आली आणि लुधियाना येथील 6 मुलांनी तिला हिसार येथे आणले आणि या सर्वांनी वाटेत चालत्या वाहनात तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार नोंदवली आहे. यानंतर हिसारला बेशुद्ध अवस्थेत सोडून तेथून पळ काढला असं पिडीतेचं म्हणणं आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून पोलिस स्टेशन डिव्हिजन क्रमांक 5 लुधियाना पोलिसांकडे पाठवला आहे. पीडित मुलीचे मेडिकल करून तिला वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. मुलीला हिसार पोलिसांच्या देखरेखीखाली मिनी सचिवालयातील वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. आता लुधियाना पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लुधियाना पोलिसांचे पथक पीडितेला घेण्यासाठी गुरुवारी हिस्सारला पोहोचेल.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळHaryanaहरयाणाPoliceपोलिसcarकार