शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती कारागृहात लैंगिक अत्याचार, तृतीयपंथीयाची तक्रार; ५ कारागृह अधिकाऱ्यांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 01:12 IST

आरोपींमध्ये दोन अट्टल गुन्हेगारांचा समावेश

नरेश डोंगरेनागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या एका तृतीयपंथीयाचा लैंगिक छळ करून विनयभंग केल्याच्या आरोपाखाली कारागृहाचे पाच अधिकारी, दोन कर्मचारी आणि दोन अट्टल गुन्हेगार अशा नऊ जणांविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. या घडामोडींमुळे राज्याच्या कारागृह प्रशासनात भूकंप येण्याचे संकेत मिळाले आहेत. नागपूर शहरात तृतीयपंथीयांचे दोन मोठे गट आहेत. वर्चस्वाच्या वादातून त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. त्यातून ४ जून २०१९ ला तृतीयपंथी चमचम गजभिये हिची दुसऱ्या गटाचा म्होरक्या सपन उर्फ उत्तम बाबा सेनापती आणि त्याच्या साथीदारांनी निर्घुण हत्या केली होती. पोलिसांनी अटक केल्यापासून उत्तम बाबा येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे.

या कारागृहात गेल्या दोन वर्षात तुरुंगाधिकारी, कर्मचारी आणि अट्टल गुन्हेगार यांनी अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची ओरड वजा तक्रार उत्तमने केली होती. कारागृह प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे त्याने जिल्हा न्यायाधीश यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले. या पत्राची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि कारागृह अधीक्षकांना उत्तमला तक्रार नोंदवण्यासाठी धंतोली पोलीस ठाण्यात नेण्याचे आदेश दिले.  या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सायंकाळी कारागृह प्रशासनाने उत्तम बाबाला धंतोली पोलीस ठाण्यात नेले. त्याची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची आधी वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यानंतर जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती रात्री ११.३० पर्यंत चालली. शेवटी मध्यरात्री या प्रकरणात कलम ३७७ ( अनैसर्गिक अत्याचार) आणि ३५४ (विनयभंग) नुसार वरिष्ठ तुरुंगाधिकारी कांदे, तुरुंगाधिकारी भोसले, तुरुंगाधिकारी काळपांडे, तुरुंगाधिकारी नाईक तसेच तुरुंग कर्मचारी वानखेडे आणि अन्य एक या सात जणांसह कुख्यात गुन्हेगार दर्शनसिंग कपूर आणि मुकेश यादव अशा एकूण नऊ जणांविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रात्री ११.४५ ला गुन्हा दाखल झाल्याची माहिती उशिरा रात्री धंतोलीचे ठाणेदार लांडगे यांनी लोकमतला दिली.वादग्रस्त घटना आणि वेळोवेळी चर्चानागपूरचे मध्यवर्ती कारागृह गेल्या काही  वर्षात अनेकदा वेगवेगळ्या वादग्रस्त घटनांमुळे चर्चेला आले आहे. कारागृहात कैद्यांना मटन, दारू, गांजा, पत्ते पुरविले जात असल्याचा खुलासा एका व्हिडिओच्या माध्यमातून लोकमतने केला होता. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती.  सरकारने त्याची गंभीर दखल घेत तत्कालीन कारागृह अधिकाऱ्यांना वठणीवर आणून हे प्रकार बंद केले होते. या  घटनेनंतर अटल गुन्हेगारांनी पहाटेच्या वेळी कारागृहातून पलायन करून देशभर खळबळ उडवून दिली होती. 

या घटनेनंतर एका गुन्हेगाराची दुसऱ्या एका गुन्हेगाराने कारागृहात हत्या केली होती. या घटनांमुळे मध्यवर्ती कारागृहातील भोंगळ कारभार सर्वत्र चर्चा आणि टीकेचा विषय ठरला होता. त्यामुळे राज्य कारागृह प्रशासनाने येथे कर्तव्यकठोर अधिकारी योगेश देसाई आणि त्यानंतर अनुप कुमार कुंमरे यांना नेमले. कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेण्याबाबतच्या कडक उपाययोजना करण्याचेही आदेश दिले. परिणामी गेल्या ४ वर्षात येथील कारभार सुरळीत होता.  मात्र आता कारागृहाच्या पाच अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पुन्हा एकदा नागपूरचे मध्यवर्ती कारागृह चर्चेला आले आहे.

टॅग्स :Policeपोलिस