महिलेचे लैंगिक शोषण; दोन आरोपिंना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 20:31 IST2021-06-24T20:31:13+5:302021-06-24T20:31:46+5:30
Crime News : महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या दोन आरोपिंना अटक केली आहे.

महिलेचे लैंगिक शोषण; दोन आरोपिंना अटक
मूर्तिजापूर : येथील गोयंनका नगर भागात राहणाऱ्या दोघा नराधमांनी एका ४५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली.
एका ४५ वर्षीय महिलेस येथील गोयंनका नगर भागात राहणारे आरोपी अशोक अग्रवाल व किशन अग्रवाल यांनी सदर महिलेचे अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण करुन तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार २४ जून पिडीत महिलेने शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली. आरोपी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लैंगिक शोषण करीत आहेत व या गोष्टीची वाच्यता केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देतात असेही तक्रारीत म्हटले आहे. सदरच्या फिर्यादी वरुन आरोपी अशोक अग्रवाल व किशन अग्रवाल या दोघांविरुद्ध ३७६, ३७६ (२) (के) ३५४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक इंगळे करीत आहे.