अल्पवयीन मुलीचा लैंगीक छळ; आराेपीस आजन्म कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 12:27 IST2021-08-16T12:27:39+5:302021-08-16T12:27:46+5:30
Crime News : स्वप्नील विनाेद डाेंगरे याने गावातील एका अल्पवयीन मुलीचा ती मुलगी दुसऱ्या वर्गात असतानापासून लैंगीक छळ केला़.

अल्पवयीन मुलीचा लैंगीक छळ; आराेपीस आजन्म कारावास
अकाेला : बार्शिटाकळी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा लैंगीक छळ करणाऱ्या आराेपीस पाॅस्काे न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही़ डी़ पींपळकर यांच्या न्यायालयाने आजन्म कारावास जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ यासाेबतच आराेपीस तब्बल तीन लाख ५० हजार रुपयांचा दंड ठाेठावला असून दंड भरल्यास अतीरीक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे़. बार्शिटाकळी तालुक्यातील रहिवासी असलेला स्वप्नील विनाेद डाेंगरे वय २३ वर्ष याच गावातील एका अल्पवयीन मुलीचा ती मुलगी दुसऱ्या वर्गात असतांनापासून लैंगीक छळ केला़. मात्र या संदर्भातील ज्ञान या अल्पवयीन मुलीला नसल्याने तीने याची वाच्यता कुठेही केली नाही़. माच १० जुलै २०१९ राेजी तीच्या शाळेतील लैंगीक अत्याचार या विषयावर समुपदेशन झाल्यानंतर तीला तीच्यावर अशाच प्रकारे अत्याचार झाल्याचे लक्षात आले़. तीने हा प्रकार घरी येउन तातडीने आइला सांगीतला़. आइने मुलीसह पाेलिस स्टेशन गाठले़ ११ जुलै २०१९ राेजी या प्रकरणाची तक्रार बार्शिटाकळी पाेलीस ठाण्यात केली. पाेलिसांनी अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून आराेपी स्वप्नील डाेंगरे याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ व पाेस्काे कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला़ त्यानंतर या प्रकरणाचा तपास बार्शिटाकळी पाेलिस स्टेशनचे पीएसआय रामेश्वर चव्हाण यांनी करून दाेषाराेपपत्र न्यायालयात सादर केले़.
न्यायालयाने या प्रकरणात ८ साक्षीदात तपासल्यानंतर आराेपीविरुध्द आढळलेल्या ठाेस पुराव्यावरुन त्याला पाेस्काे कायद्याच्या विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ यासाेबतच तीन लाख ५० हजार रुपयांचा दंड ठाेठावला़ दंड भरल्यास अतीरीक्त सहा महीन्यांच्या कारावासाची शिक्षेचे प्रावधानान न्यायालयाने केले आहे़ या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने अॅड मंगला पांडे यांनी कामकाज पाहीले़ तर पैरवी अधिकारी म्हणूण एएसआय प्रवीण पाटील यांनी कामकाज पाहीले़.
शाळेतील समुपदेशनाने घटना उघड
बार्शिटाकळी तालुक्यतील एका खेडेगावात असलेली मुलगी सात वर्ष वयाची असतांना तीच्यावर स्वप्नील डाेंगरे याने लैंगीक अत्याचार सुरु केले़ मात्र या सर्व प्रकाराबाबत अनभीज्ञ असलेल्या मुलीने कुणाकडेही वाच्यता केली नाही़ एके दिवशी शाळेत लैागीक अत्याचार याच विषयावर समुपदेशन झाले़ त्यामूळे मुलीला तीच्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच तीने कुटुंबीयांना सांगीतले़ त्यांनी पाेलिस ठाण्यात तक्रार केली़ वैद्यकीय तपासणीनंतर प्रकरणाचा उलगडा झाला़ या प्रकरणात शाळेतील समुपदेशन माेलाची भुमीका बजावणारे ठरले़
दुसऱ्या वर्गात असतांनापासून छळ
पिडीत मुलगी सात वर्षांची म्हणजेच दुसऱ्या वर्गात असतांनापासूनच या मुलीचा लैंगीक छळ करण्यात आला़ सात वर्षांची असतांनापासून तर १२ वर्षांची हाेइपर्यंत म्हणजेच या मुलीच्या हा प्रकार लक्षात येइपर्यंत तीचा अशा प्रकारे लैंगीक छळ सुरुच हाेता़ सतत पाच वर्ष लैंगीक छळ करणाऱ्या या आराेपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर तीला न्याय मीळाल्याची प्रतीक्रीया उमटत आहेत़