उल्हासनगरात लॉजवर अनैतिक धंदे; पाच महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 13:18 IST2021-09-11T13:17:34+5:302021-09-11T13:18:59+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-४ मोर्यानगरी आशेळेगाव मुख्य रस्त्या वरील रहिवासी क्षेत्रात पुनम लॉजिंग ॲन्ड बोर्डिंग आहे. या लॉज मध्ये महिलांकडून अनैतिक धंदा करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळावी होती.

sex Racket busted at lodges in Ulhasnagar; Five women released | उल्हासनगरात लॉजवर अनैतिक धंदे; पाच महिलांची सुटका

उल्हासनगरात लॉजवर अनैतिक धंदे; पाच महिलांची सुटका

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरातील पूनम लॉजमध्ये पोलिसांनी धाड टाकून अनैतिक धंदा करणाऱ्या पाच महिलांची सुटका केली. याप्रकरणी लॉज चालकाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ मोर्यानगरी आशेळेगाव मुख्य रस्त्या वरील रहिवासी क्षेत्रात पुनम लॉजिंग ॲन्ड बोर्डिंग आहे. या लॉज मध्ये महिलांकडून अनैतिक धंदा करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळावी होती. माहितीनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त डी डी टेळे व विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या आदेशानुसार पोलिसांनी गुरवारी पूनम लॉजवर धाड टाकली असता, ५ महिलांना कडून अनैतिक धंदा करून घेतले जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांची सुटका करून लॉज चालक जीवन शेट्टी (४२) याला अटक करून गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

यानिमित्ताने शहरातील बहुतांश लॉजिग अँड बोर्डिंगवर अनैतिक धंदा चालत असल्याची चर्चा याप्रकाराने होत आहे. अश्या लॉजिंगवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Web Title: sex Racket busted at lodges in Ulhasnagar; Five women released