शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

कुंटनखान्यावर छापा; देहविक्रय करणाऱ्या चार तरुणी पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:50 IST

अकोला: गोरक्षण रोडवरील अंबिका नगरमधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी छापा टाकला.

ठळक मुद्देदबा धरून बसलेल्या पोलिसांना एका प्लॅटमध्ये ग्राहक जाताना दिसताच छापा टाकला.या ठिकाणावरून पोलिसांनी चार युवती व ग्राहक नको त्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी युवती व ग्राहकाला ताब्यात घेतले आहे, तर एक ग्राहक फरार झाला.

अकोला: गोरक्षण रोडवरील अंबिका नगरमधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी छापा टाकला. या फ्लॅटमधून चार युवतींसह एका ग्राहकाला रंगेहात पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले, तर दुसरा ग्राहक पोलिसांना पाहून पळून जाण्यात यशस्वी झाला.पुसद येथील रहिवासी प्रीती महादेव कुरील व महादेव कुरील या दाम्पत्याने अकोल्यातील गोरक्षण रोडवरील अंबिका नगरमध्ये एक फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला. त्यानंतर या फ्लॅटमध्ये युवतींकडून देहव्यापार करून घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांना मिळाली. यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक छाया वाघ यांच्या नेतृत्वात एक पथक गठित केले. या पथकाने अंबिका नगरमध्ये सापळा रचला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांना एका प्लॅटमध्ये ग्राहक जाताना दिसताच पोलिसांनी तेथे छापा टाकला. या ठिकाणावरून पोलिसांनी चार युवती व ग्राहक नको त्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी युवती व ग्राहकाला ताब्यात घेतले आहे, तर एक ग्राहक फरार झाला. त्यांच्याकडून पोलिसांनी आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत. चार युवती, कुंटनखाना चालवणारी महिला प्रीती महादेव कुरील, महादेव कुरील अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. युवती २० वर्ष वयोगटातीलदेहव्यापारात गुंतलेल्या युवती या १८ ते १९ वर्ष वयोगटातील आहेत. जुने शहर, कौलखेड व आदर्शनगर येथील या युवती आहेत. हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत ग्राहकांकडून पैसे घेऊन त्याबदल्यात त्या देहव्यापार करीत असल्याची माहिती समोर आली आहे, तर प्रीती महादेव कुरील व तिचा पती महादेव कुरील हे दोघे कुंटनखाना चालवत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाsex crimeसेक्स गुन्हाCrime Newsगुन्हेगारी