शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सात फेरे, अक्षतांवर भारी पडला 'अर्धवट शिजलेला भात'; 10 वर्षांचा संसार अन् अचानक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 16:06 IST

Husband Wife Fight: पत्नीशी भांडण झाल्यानंतर पतीने जे केलं त्याचा साऱ्यांनाच धक्का बसला

Husband Wife Fight over Rice: नवरा बायकोमधील रुसवा फुगवा किंवा भांडणे ही काही नवी गोष्ट नाही. प्रत्येक संसारात नवरा-बायकोमध्ये छोटे मोठे वाद होत असतात. आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडी , त्याच्या वागण्या-बोलण्याची पद्धत किंवा अगदी छोटीशी गोष्ट यावरून नवरा- बायकोमध्ये वाद किंवा भांडण होताना पाहायला मिळते. काही वेळा बायकोकडून जेवणात काही तरी चूक झाली म्हणूनही नवरा चिडतानाचे प्रसंग घडताना दिसतात. पण सध्या घडलेल्या एका प्रकारात १० वर्षांचा संसार केलेल्या नवरा-बायकोमध्ये केवळ जेवणावरून वाद झाला आणि त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याचा कोणालाच अंदाज नव्हता. त्याच्या त्या कृतीने साऱ्यांनाच धक्का बसला.

उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात स्वयंपाक करण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्याचवेळी घटनास्थळावरून आरोपी तरुणाला अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे संपूर्ण प्रकरण अलिगढ जिल्ह्यातील रोरावार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहबूब नगर भागात घडल्याचे उघडकीस आले.

जेवताना भांडण झाले आणि नंतर...

घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पोहोचलेल्या एका महिलेने सांगितले की, जिचा मृत्यू झाला ती त्यांची भाची असून तिचे सुमारे 10 वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते, ती 8 वर्षांची मुलगी आहे. स्वयंपाक करण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. रविवारी रात्री स्वयंपाक करण्यावरून सगीर नावाच्या व्यक्तीचा आपली पत्नी गुड्डी हिच्याशी वाद झाला. भात अर्धवट शिजला असल्याने सगीर प्रचंड संतापला. त्याने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि स्थानिक लोकांनी आरोपी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला.

खून करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले एसपी सिटी कुलदीप गुणवत म्हणाले की, रोरावार पोलीस ठाण्यांतर्गत महमूद नगरमध्ये सगीर नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पतीला घटनास्थळावरून अटक केली. यासोबतच हत्येसाठी वापरलेले गाळेही जप्त करण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवण्यात आला असून पंचनामा करण्याची आगाऊ कार्यवाही सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आगाऊ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश