अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग करणाऱ्यास सात महिन्यांची शिक्षा

By जितेंद्र कालेकर | Updated: January 10, 2024 21:57 IST2024-01-10T21:57:30+5:302024-01-10T21:57:51+5:30

एक हजार रुपयांचा दंड न भरल्यास दहा दिवसांच्या अतिरिक्त कैदेची शिक्षाही सुनावली आहे.

Seven months punishment for molesting a minor girl | अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग करणाऱ्यास सात महिन्यांची शिक्षा

अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग करणाऱ्यास सात महिन्यांची शिक्षा

ठाणे: अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग करणाऱ्या नितीन नाडार (२८) या आरोपीला ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि विशेष न्यायाधीश (पोस्को) व्ही. व्ही. विरकर यांनी सात महिने कैदेची आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. एक हजार रुपयांचा दंड न भरल्यास दहा दिवसांच्या अतिरिक्त कैदेची शिक्षाही सुनावली आहे.

काशीमीरा, मीरा रोड पूर्व भागातील या १३ वर्षीय पिडीत मुलीला त्याच भागातील नाडार हा नेहमी पाठलाग करीत असे. २६ डिसेंबर २०१९ रोजीही सायंकाळी ६.५५ वाजण्याच्या सुमारास त्याने पुन्हा तिचा अशाच प्रकारे अश्लील शब्द वापरुन विनयभंग केला. नंतर याबाबतचा जाब विचारणाऱ्या तिच्या आईलाही त्याने अशाच प्रकारे अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांना मी खिशात घेऊन फिरतो. त्यामुळे आपले कोणी काही वाकडे करु शकणार नाही. असे सांगत त्यांनाही धमकी दिली. 

याप्रकरणी २७ डिसेंबर २०१९ रोजी त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याला पोलिसांनी अटकही केली होती. सात महिने कारागृहात राहिल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. याप्रकरणी ठाणे न्यायालयात १० जानेवारी २०२४ रोजी सुनावणी झाली. तेंव्हा न्यायालयाने त्याला ताे पूर्वी कारागृहात असलेल्या महिन्यांचीच म्हणजे सात महिन्यांची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली

Web Title: Seven months punishment for molesting a minor girl