शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

नराधमांनी तरुणीवर केला गँगरेप, भावाला मारहाण करून फेकले विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 20:03 IST

 एक मुलगी आपल्या भावासह तिच्या गावातून पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी आली होती.

ठळक मुद्दे या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना बैतूल परिसरातील पाढरजवळ घडल्याचे सांगितले जात आहे.आरोपी पकडला गेला, मात्र पोलिसांना बोलताच आरोपीने झटका देऊन तेथून पळ काढला.

मध्यप्रदेशात बलात्काराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ही बुधवारी रात्रीची घडलेली घटना आहे. एक मुलगी आपल्या भावासह तिच्या गावातून पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी आली होती. त्यानंतर आरोपीने भावाला मारहाण करुन विहिरीत फेकले. त्यानंतर आरोपीने तरुणीसोबत सामूहिक बलात्कार केला. 

या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींपैकी तीन अल्पवयीन आहेत. उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी मजुरीचे काम करायचे.ही खळबळजनक घटना बैतूल परिसरातील पाढरजवळ घडल्याचे सांगितले जात आहे. पाढरजवळच्या गावातील ही मुलगी आपल्या भावासोबत दुचाकीवरुन पाढर येथे आली होती, मुलीवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. असं सांगितलं जातंय की, आरोपींनी प्रथम त्या मुलीच्या भावावर हल्ला केला आणि नंतर त्याला जवळच्या एका विहिरीत फेकले. यानंतर या सात आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्काराची केला.पीडित मुलीने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडितेचे मेडिकल करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेतील प्रत्यक्षदर्शी भावाचा भाऊ म्हणाला, “आम्ही बुधवारी रात्री आठ वाजता माझ्या बहिणीसमवेत पेट्रोल पंपावर पेट्रोल घ्यायला गेलो होतो आणि परत जात असताना आमच्या मोटारसायकलची हेड लाइट खराब झाली होती. त्यासाठी आम्ही थांबलो आणि हेड लाईट दुरुस्त करत होतो. पुढे तो म्हणाला, 'दोन मोटारसायकलवरून आमच्या पाठोपाठ 7 लोक आले. त्यातील तिघांनी प्रथम मला शिवीगाळ केली. त्यानंतर, मला पकडून विहिरीत फेकले आणि माझ्या बहिणीला घेऊन गेले. जेव्हा मी विहिरीतून बाहेर पडलो आणि कुटुंबाला याबाबत माहिती दिली. तेव्हा माझा भाऊ आणि एक बहीण माझ्यासोबत आले. आम्ही तिचा शोध घ्यायला सुरूवात केली. त्यावेळी आरोपी लोकेश पकडला गेला. त्याच्याकडून आधार कार्ड घेतले. आरोपी पकडला गेला, मात्र पोलिसांना बोलताच आरोपीने झटका देऊन तेथून पळ काढला. 

बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको

Coronavirus Lockdown : धार्मिक सभा रोखणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाचजण जखमी 

 

सांगलीत एकाचा खून, मृतदेह पोत्यातून नदीत टाकला

 

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

सात आरोपींपैकी दोन आरोपी फरार आहेत. या घटनेनंतर लॉकडाऊनदरम्यान झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लॉकडाउन असताना सात जण दोन मोटारसायकलींवर कसे फिरत होते, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सध्या पोलिसही याचा तपास करत आहेत. त्याचवेळी, बैतूलचे एसडीओपी विजय पुंज सांगतात, 'पीडितेने पोलिसात अहवाल दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू झाला आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटक