शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी तरुणाकडून सात लाखांचे कोकेन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 16:00 IST

तब्बल सात लाख रुपयांचे बेकायदा कोकेन बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका विदेशी तरुणाला जेरबंद केले आहे.

पुणे : तब्बल सात लाख रुपयांचे बेकायदा कोकेन बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका विदेशी तरुणाला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून कोकेन, वजन काटा, रोकड आणि मोबाईल असा एकूण सात लाख 38 हजार 120 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गुलटेकडी येथील सॅलिसबरी पार्क येथे करण्यात आली.

    अ‍ॅन्टोनी मॅक्सवेल ऊर्फ ऊगुचूकू इमॅन्यूएल (वय 35, रा. मंत्री इस्टेट मागे, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मुळचा नायजेरीयाचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अ‍ॅन्टोनी हा अंमली पदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती पोलीस हवालदार शैलेश जगताप व सहायक फौजदार अविनाश शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत सापळा रचून आरोपीला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून कोकेनसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये हवालदार शैलेश जगताप, सहायक फौजदार अविनाश शिंदे, मुशर्रफ पठाण, बाबा शिर्के, हेमा ढेबे, साबळे यांनी भाग घेतला. याप्रकरणी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.      त्याचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात आला असून अ‍ॅन्टोनी हा टुरिस्ट (पर्यटन) व्हिसावर भारतामध्ये आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरु आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेDrugsअमली पदार्थSmugglingतस्करी