शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नोकराचा कारनामा! ४ दिवसांपूर्वीच कामावर आला अन् एक कोटीच्या दागिन्यांवर डल्ला मारून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:18 IST

संजय गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं की, चार दिवसांपूर्वी त्यांनी एका प्लेसमेंट एजन्सीमार्फत नागार्जुन नावाच्या नोकराला कामावर ठेवलं होतं.

राजधानीतील शाहदरा भागातील एका घरातून १ कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या नोकर आणि त्याच्या मित्राला पोलिसांनीअटक केली आहे. सुरेश मलिक उर्फ ​​नागार्जुन आणि त्याचा साथीदार रोहित कुमार मलिक अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की दोघांविरुद्ध यापूर्वीही असेच गुन्हे दाखल आहेत.

नोकराला ४ दिवसांपूर्वी ठेवलं होतं कामावर

डीसीपी प्रशांत गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी शाहदरा पोलिसांना तक्रार मिळाली. तक्रारदार संजय गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं की, चार दिवसांपूर्वी त्यांनी एका प्लेसमेंट एजन्सीमार्फत नागार्जुन नावाच्या नोकराला कामावर ठेवलं होतं. त्याचं पोलीस व्हेरिफिकेशनही झालं नव्हतं. त्याने घरी काम करायला सुरुवात केली. याच दरम्यान १४ मार्च रोजी कुटुंब होळी साजरी करण्यासाठी गुरुग्रामला गेलं होतं. १५ मार्च रोजी दुपारी ते घरी आले तेव्हा चोरी झाल्याचं उघडकीस आलं.

एक कोटीचे सोन्याचे, हिऱ्यांचे दागिने गायब

घरातून सहा लाख रोख रक्कम आणि सुमारे एक कोटी किमतीचे सोन्याचे, हिऱ्यांचे दागिने गायब असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीच्या हालचाली तपासण्यात आल्या आणि शोध घेण्यात आला.

दोन जणांना अटक

आरोपीचे ओळखपत्रही बनावट असल्याचं आढळून आलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलीस पथकाने दिल्लीतील लाडो सराई येथून नागार्जुनला अटक केली. नंतर त्याचा दुसरा साथीदार रोहित कुमार मलिक याला अटक करण्यात आली. दोघेही ओडिशाचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला मालही जप्त केला आहे. 

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसArrestअटकThiefचोर