शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांची लूट रोखूनही मालकानं दिलं टी-शर्ट; नोकराची सटकली, अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 15:07 IST

जीव धोक्यात घालून नोकरानं मालकाचे 80 लाख वाचवले होते

नवी दिल्ली: जीवावर उदार होऊन तब्बल 80 लाखांची रोकड चोरी होण्यापासून वाचवणाऱ्या नोकराला मालकाकडून मोठ्या बक्षीसाची अपेक्षा होती. मात्र मालकानं नोकराला त्याच्या निष्ठेचं आणि साहसाचं बक्षीस म्हणून फक्त एक टी-शर्ट दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या नोकरानं मालकाचे 70 लाख रुपये लांबवण्याची योजना आखली. त्यात तो यशस्वीदेखील झाला. मात्र पोलिसांनी या चोरट्याला बेड्या ठोकल्या. 'आधी निष्ठावान आणि मग गद्दार' झालेल्या या नोकराची कहाणी सध्या नवी दिल्लीत चर्चेचा विषय ठरली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आझादपूरमधील एका कंपनीच्या मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या नोकराला अटक केली आहे. धान सिंह बिष्ट असं या नोकराचं नाव आहे. पोलिसांनी धान सिंहकडून 50 लाख रुपये आणि संपत्तीची कागदपत्रं जप्त केली आहेत. धान सिंहनं  मालकाकडून लांबवलेल्या रकमेतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली होती. त्या वस्तूदेखील पोलिसांनी हस्तगत केल्या. या चोरीसाठी धान सिंहला याकूब नावाच्या एका व्यक्तीनं मदत केली होती. त्याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार लाख रुपये जप्त केले आहेत. आझादपूरमधील एका कंपनीच्या मालकाकडे धान सिंह काम करायचा. त्याला मालकानं 27 ऑगस्टला 70 लाख रुपये आणण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. ही रक्कम घेवून धान सिंह फरार झाला. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी धान सिंहच्या साथीदाराला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बुराडीमधून धान सिंहला बेड्या ठोकण्यात आल्या. धान सिंहनं काही महिन्यांपूर्वी जीवावर उदार होऊन मालकाचे 80 लाख रुपये वाचवले होते. मात्र त्यावेळी मालकानं त्याला फक्त एक टी-शर्ट गिफ्ट दिलं होतं. त्यामुळेच मालकाचे 70 लाख लांबवल्याची माहिती धान सिंहनं पोलिसांना दिली.  

टॅग्स :jailतुरुंगThiefचोरtheftचोरीArrestअटक