शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रू वस्तीत नोकराने मारला कोटींचा डल्ला; अखेर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 12:55 IST

मालमत्तेसह आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गावदेवीच्या उच्चभ्रू वस्तीत नोकराने कोटींचा डल्ला मारल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी १ कोटी ७१ लाख रुपयांच्या मालमत्तेसह आरोपी मायलेन जेम्स सुरेन ऊर्फ मोना (३७) आणि अब्दुल शेख (३८) यांना अटक केली आहे.

मायलेन ही फिर्यादीच्या घरी गेल्या १० वर्षापासून काम करते. फिर्यादीच्या पत्नीने बेडरूमच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने त्यांनी १८ मार्च रोजी परिधान केले आणि पुन्हा आणून तिथेच ठेवले. मात्र महिनाभरानंतर पुन्हा जेव्हा त्या दागिने अन्य एका कार्यक्रमासाठी वापरायचे म्हणून कपाट उघडायला गेल्या, त्यावेळी त्यातून सोन्याचा आणि हिऱ्याचे दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केल्यावर काहीच माहीत नसल्याचा आव आणणाऱ्या मायलेननेच अधिक चौकशीमध्ये फेब्रुवारी, २०२३ पासून दागिने चोरीचे उघड झाल्यावर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 प्रभारी पोलिस निरीक्षक शशिकांत यादव, सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास दराडे, धनेश सातार्डेकर आणि पथकाने तपास सुरू करून आसाममधून मायलेजच्या मुसक्या आवळल्या. तिच्या सीडीआरच्या मदतीने  जोगेश्वरी स्टेशन परिसरातून बाहेरच्या राज्यात पळण्याच्या तयारीत असलेल्या अब्दुल मुनाफ याचा गाशा गुंडाळला.   मुनाफ हा या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असून त्याचे साथीदार हसमुख बागडा हा सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांचा दलाल, नुरुद्दीन शेख व संगीता कांबळे यांनाही अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस