शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

Nashik Accident: नाशिकमध्ये अपघातांची मालिका; स्कोडा कारवर कंटेनर आदळला, चार मित्रांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 23:27 IST

Nashik Accident news: बकरी ईदचा सण आटोपून बुधवारी सकाळी जुने नाशिक, वडाळारोड या भागातील चौघे तरुण स्कोडा कारने इगतपुरी भागात पर्यटनासाठी गेले होते.

नाशिक : पावसाळी पर्यटन आटोपून जुन्या नाशकातील पाच मित्र स्कोडा मोटारीने बुधवारी (दि. २१) इगतपुरीकडून नाशिककडे परतत होते. यावेळी मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे शिवारात त्यांच्या मोटारीवर मुंबईकडे जाणारा कंटेनर दुभाजक तोडून यांच्या मोटारीवर येऊन आदळला. दुर्घटना इतकी भीषण होती की कारचा संपूर्णत: चक्काचूर होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला. या घटनेने संपूर्ण जुने नाशिक भागातील मुस्लीम समुदायात शोककळा पसरली.

बकरी ईदचा सण आटोपून बुधवारी सकाळी जुने नाशिक, वडाळारोड या भागातील चौघे तरुण स्कोडा कारने इगतपुरी भागात पर्यटनासाठी गेले होते. तेथून नाशिककडे परतीचा प्रवासात असताना वाडीवऱ्हे शिवारात त्यांच्या मोटारीवर नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर (एनएल ०१ अेअे. १२४८) थेट दुभाजक तोडून नाशिक लेनवरून जाणाऱ्या स्कोडावर येऊन आदळला. या अपघातात कारमधील पाच युवक पूर्णत: दाबले जाऊन गंभीररीत्या जखमी झाले.

घटनास्थळी आपत्कालीन मदत पोहोचेपर्यंत चौघा तरुणांनी आपले प्राण सोडले होते. एका तरुणाला गंभीर अवस्थेत कारचा पत्रा कापून पोलिसांनी बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित चव्हाण हे पथकाला घेऊन घटनास्थळी पोहचले. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका व महामार्ग् प्राधिकरणाला माहिती देत अतिरिक्त मदत पाचारण केली. दुर्घटना इतकी भीषण होती की कारचा अक्षरक्ष: भुगा झाला. कंटेनरची बॉडी ही पुर्णत: ट्रेलरवरुन सुटून वाऱ्यासारखी रस्त्यावर फेकली गेल्याने त्याच्या जबर धक्क्याने कारही रस्त्यावरुन बाजूला वेगाने जाऊन उलटली आणि लोखंडी पत्र्याची बॉडीखाली कार दाबली गेली. क्रेनच्या सहाय्याने हा लोखंडी मालवाहु डबा उचलून कारमधील युवकांना बाहेर काढण्यात आले. पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत होता. चौघांचे मृतदेह आणि नबील रऊफ सय्यद (२१) या तरुणाला अत्यवस्थ अवस्थेत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंटेनर चालक, क्लिनर घटनास्थळावरुन फरार झाले असून त्यांचा पोलीस शाेध घेत आहेत. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

यांचा झाला मृत्यूरिजवान इकबाल कुरेशी (३०,रा.चौकमंडई, जुने नाशिक), जुबेर इकबाल शेख (३२,रा. अशोकामार्ग), हुजेफा उर्फ सोनु एजाज उस्मानी (२८,रा. भाभानगर, वडाळारोड), सोहेल अकील पठाण (२९,रा.विनयनगर)

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात