शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस गाठला! 120 महिलांना न्यूड फोटो पाठविले; 54 वर्षांच्या व्यक्तीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 16:32 IST

Crime News: ओळखत नसलेल्या नंबरवरही त्याने फोटो पाठविल्याचे सांगितले. चल्लकेरेमध्येच त्याने जवळपास 50 महिलांना न्यूड फोटो पाठविल्याचे समोर आले आहे.

कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी एका 54 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांत या विकृताने 120 महिलांसह 200 हून अधिक लोकांना स्वत:चे न्यूड फोटो पाठविल्याचा आरोप आहे. 

चित्रदूर्गच्या चल्लकेरेमध्ये 54 वर्षीय रामकृष्ण यांनी कथितरित्या सहा महिन्यांच्या काळात 120 महिलांना न्यूड फोटो पाठविले आहेत. एका आठवड्यातच काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती, की त्यांना एका अज्ञात नंबरवरून अश्लिल फोटो पाठविले जात आहेत. 'द न्यूज मिनट' ने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की, तक्रारी आल्यानंतर आरोपीचा शोध सुरु झाला. त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक केला गेला. यानंतर शुक्रवारी त्याला चल्लकेरे येथील घरातून अटक करण्यात आली. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत रामकृष्णने अश्लिल फोटो पाठविल्याचे कबूल केले आहे. आपण ओळखत नसलेल्या नंबरवरही त्याने फोटो पाठविल्याचे सांगितले. चल्लकेरेमध्येच त्याने जवळपास 50 महिलांना न्यूड फोटो पाठविल्याचे समोर आले आहे. या महिलांना तो ओळखतही नव्हता. एवढेच नाही तर काही महिलांकडे तो त्यांचे फोटोही मागत होता, असे समोर आले आहे. 

रामकृष्णला चित्रदुर्गच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. 

गोव्यातही गेल्या आठवडाभरापासून खळबळगेल्या काही दिवसांपासून गोव्यामध्ये न्यूड फोटोशूटमुळे वातावरण तापलेले आहे. पूनम पांडे हिच्या गोव्यात शूट झालेल्या सॉफ्ट पॉर्न व्हिडिओमुळे राज्याची प्रतिमा मालिन झालेली असतानाच सिनेस्टार आणि मॉडेल मिलिंद सोमण याचा गोव्यातील बिचवर विवस्त्र धावतानाचा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर झळकल्याने गोव्याचे नाव पुन्हा एकदा कुचर्चेत आले आहे. मिलिंद सोमण याने आपल्या 55 व्या वाढदिनी हा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला असून विवस्त्रावस्थेत धावतानाचा फोटो त्याची पत्नी अंकिता कुवर हिने शूट केला आहे.

लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ तर काही महिन्यांपूर्वी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील गंगा नदीवरील लोकप्रिय लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ बनवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका फ्रेंच युवतीला अटक केली होती. या विदेशी युवतीला काही अटींवर जामीन मिळाला आहे. रिपोर्टनुसार, एक २७ वर्षीय विदेशी युवती ऋषिकेश येथील लक्ष्मण लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ शूट करत होती. याप्रकरणी येथील स्थानिक नगरसेवक गजेंद्र सजवान यांनी २५ ऑगस्ट रोजी या युवतीविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.ऋषिकेशमधील मुनी की रेती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ उपनिरीक्षक आर. के. सैनी म्हणाले की, "सजवान यांनी तक्रार केली होती की, एक महिला न्यूड व्हिडिओ व फोटो शूट करत होती." सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळाल्याचे नगरसेवक म्हणाले होते.

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिसArrestअटकMolestationविनयभंग