शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! राहत्या इमारतीत वकीलच चालवत होता जुगाराचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 22:27 IST

गुन्हे शाखेची कारवाई, वकिलासह ८ जणांना अटक

ठळक मुद्दे या कारवाईत पावणेतीन लाखांच्या रोकडसहित प्लास्टिक कॉईन, खेळाचे पत्ते जप्त केले आहेत.या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबई - कफ परेड येथे राहत्या इमारतीत वकीलच जुगाराचा अड्डा चालवत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष १ ने अ‍ॅड. ललित जैनसह ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.ललित जैन (४६) असे या वकिलाचे नाव आहे. कफ परेड येथील मीनू मायनर इमारत येथे हा जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक महेश तावडे, एपीआय अनंत शिंदे, पीएसआय  ज्ञानेश्वर जगताप, अंमलदार संतोष लोखंडे, तानाजी मोरे, जितेंद्र शेडगे, नितीन तायडे, शैलेश शिंदे आणि चालक अमोल वऱ्हाडी या तपास पथकाने छापा टाकला.  या कारवाईत पावणेतीन लाखांच्या रोकडसहित प्लास्टिक कॉईन, खेळाचे पत्ते जप्त केले आहेत.

त्यांनी एका खोलीतच जुगाराचा अड्डा तयार केला होता. या कारवाईतून गुन्हे शाखेने जैनसह ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात वकील आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. ज्या इमारतीत जुगाराचा अड्डा सुरू होता ती इमारत पागडी पद्धतीची असून जैन याच्या मालकीची आहे. तो मित्रांसोबत येथे जुगार खेळण्यासाठी येत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक  तपास करत आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :raidधाडMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकadvocateवकिल