शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

खळबळजनक! वेश्यावस्तीत टॅक्सी नेण्यास नकार दिला; आरपीएफ जवानाने चालकावरच केला 'अत्याचार'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 5:23 PM

या प्रकरणाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने आरोपी जवान अमितला तडकाफडकी निलंबित केले आहे.

ठळक मुद्देकॉन्स्टेबलने त्याचे पैसे आणि टॅक्सीची चावी देखील काढून घेतल्याचा आरोप आहे. भा. दं. वि. कलम 377 अनैसर्गिक कृत्य, कलम 394 लूट यासह कलम 387,341,324,504 आणि 506 (2 ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - दक्षिण मुंबईत शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे. वेश्यावस्तीत जाण्यास नकार दिल्याने एका टॅक्सी चालकावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने (आरपीएफ) हे कृत्य केल्याची माहिती समोर आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या आरोपी कॉन्स्टेबलचे नाव अमित धनकड आहे.आरोपी कॉन्टेबल हा शनिवारी रात्री पीडित चालकाच्या टॅक्सीत बसला होता. त्यावेळी कॉन्स्टेबलने टॅक्सी ग्रॅण्टरोड येथील वेश्यावस्तीत नेण्यास सांगितलं. मात्र टॅक्सी तिकडे नेण्यास चालकाने नकार दिला. त्यावेळी कॉन्स्टेबलने चालकाला मारहाण करुन त्याच्यासोबतच अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित टॅक्सी चालकाने एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.आरोपी कॉन्स्टेबल 11 जानेवारीला दुपारी 4 ते रात्री 11 अशी ड्युटी संपवून आला होता. त्यावेळी त्याने टॅक्सी चालकाला टॅक्सी डिमेलो रोडकडे नेण्यास सांगितली. त्यानंतर त्याने टॅक्सी ग्रॅण्टरोडवरील वेश्यावस्तीत नेण्यास सांगितली. मात्र, टॅक्सी चालकाने त्याला नकार दिल्याने चिडलेल्या कॉन्स्टेबलने त्याला मारहाण केली. आरोपी कॉन्स्टेबलने टॅक्सी चालकाला रेल्वेच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन अनैसर्गिक अत्याचार करत बलात्कार केला. त्याशिवाय कॉन्स्टेबलने त्याचे पैसे आणि टॅक्सीची चावी देखील काढून घेतल्याचा आरोप आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. त्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. त्याच्याविरोधात भा. दं. वि. कलम 377 अनैसर्गिक कृत्य, कलम 394 लूट यासह कलम 387,341,324,504 आणि 506 (2 ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमितला अटक केली आहे. या प्रकरणाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने आरोपी जवान अमितला तडकाफडकी निलंबित केले आहे.

 

टॅग्स :Rapeबलात्कारTaxiटॅक्सीMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकProstitutionवेश्याव्यवसाय