शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

खळबळजनक! मेव्हण्याने केली भावोजीची चाकूने भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 22:15 IST

दिवसाढवळ्या नालासोपारा पोलीस ठाण्यातच घडला प्रकार

ठळक मुद्देहत्या करणाऱ्या मेव्हण्याला पोलिसांनी पकडले असून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. अचानक घडलेल्या या हत्याकांडामुळे पोलीस ठाण्यात भयाचे वातावरण पसरले आहे.

नालासोपारा - पश्चिमेकडील परिसरात राहणाऱ्या लग्न झालेल्या बहिणीने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने रागाच्या भरात भावाने सोमवारी संध्याकाळी दिवसाढवळ्या नालासोपारा पोलीस ठाण्यातच भावोजीची गळ्यात चाकू भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे नालासोपारा शहरात खळबळ माजली असून दोन्ही परिवारावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर हत्या करणाऱ्या मेव्हण्याला पोलिसांनी पकडले असून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे राहणाऱ्या कोमल हिचे नालासोपारा शहरात राहणाऱ्या रिक्षाचालक आकाश कोळेकर (22) याच्या सोबत लग्न झाले होते. रविवारी कोमल हिने कोणत्यातरी कारणावरून घरी किचनमधील पंख्याच्या हुकाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली होती. ही माहिती कोमलच्या घरच्यांना गावी कळल्यावर अंत्यविधीसाठी नालासोपाऱ्यात आले होते. तिच्या घरच्यांनी आकाशच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याने त्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक विनायक माने यांच्याकडे आले होते. सदर घटनेची गंभीरता लक्षात घेता आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून तपासासाठी आणि जबाब घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आकाशला व दोन्ही परिवाराच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. जबाब सुरू असताना अचानक कोमलचा भाऊ आरोपी रवींद्र शंकर काळेल (22) याने खिशात लपवून आणलेला चाकू गळ्यामध्ये भोसकला. रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांनी आकाशला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती केले पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या हत्याकांडामुळे पोलीस ठाण्यात भयाचे वातावरण पसरले आहे.या घटनेमागील खरी कहाणीकाही वर्षांपूर्वी आकाश आणि कोमल यांचे प्रेमप्रकरण होते म्हणून दोघेही पळून गेले होते. त्यावेळी रवींद्र ने बहिणीला घरी आणून तिचे दुसऱ्यासोबत लग्न केले पण ते लग्न मोडल्यावर दीड वर्षांपूर्वी आकाशसोबत रवींद्रने लग्न लावून दिले होते.

 सदर आरोपी रवींद्र याला कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीच झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. - सर्जेराव कोळेकर (मयत आकाशचे वडील) सदर आरोपीने पोलीस ठाण्यात घुसून चाकूने खून केल्याबद्दल त्याला अटक केली असून पुरावा म्हणून चाकू जप्त केला आहे. या घटनेमध्ये पोलीस फिर्यादी होणार आहे. - विजयकांत सागर (अप्पर पोलीस अधीक्षक, वसई विभाग)

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक