शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

प्रेमभंग झालेल्या प्रियकराने प्रेयसीला धमकी देणारी पत्रे लावल्याने पुण्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 10:08 IST

प्रेमभंग झालेल्या तरुणाने प्रेयसीला धमकी देणारी पत्रे हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजच्या परिसरात लावल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे  - प्रेमभंग झालेल्या तरुणाने प्रेयसीला धमकी देणारी पत्रे हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजच्या परिसरात लावल्याने एकच खळबळ उडाली असून याची माहिती मिळताच पोलिसांनी ही सर्व पत्रे काढून जप्त करण्यास सुरुवात केली आहे.हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजच्या समोर रस्त्यावरील खांबावर काही जणांना ही पत्रे लावलेली आढळून आली. कॉलेजला येणाऱ्या तरुणांना ते समजल्यावर ती वाचण्यासाठी तेथे एकच झुंबड उडाली. ही बातमी काही वेळात सर्वत्र पसरली. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी आले. व त्यांनी ती पत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली. अनेक पत्रे परिसरात लावण्यात आली आहेत. या पत्रात म्हटल्याप्रमाणे आकाश नाव सांगणाऱ्या तरुणाने ही पत्रे लिहिली असून त्यामध्ये तो एका तरुणीशी रिलेशनशीपमध्ये होता. गेल्या वर्षी त्यांनी घरच्यांना न सांगता गुपचूप लग्न केले होते. दोघेही एकत्र राहत होते. पण काही महिन्यांपूर्वी ती त्याला सोडून गेली. कारण तिचे त्याच्या आईशी पटत नव्हते. तिला पैसा खूप महत्वाचा असून ती आता दुसऱ्याबरोबर लग्नाला तयार झाली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. एवढ्या वर्षाच्या रिलेशनशीप नवरा बायकोचे नातं तोडून ती कोण कुठल्या तरुणाबरोबर लग्न करीत आहे. जी मला सोडून आली. ती काय कोणाची राहणार असे म्हणून मी तुला राहून देणार नाहीच अशी धमकी या आकाशने त्या तरुणीला दिली आहे. हडपसर पोलीस आता या आकाशचा शोध घेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे