शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 20:59 IST

१३  वर्षांच्या शाळकरी अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देकोडीत गावातील वस्तीवर धनगर समाजाचे कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी पाल टाकून उतरले होते

सासवड : पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे एका १३  वर्षांच्या शाळकरी अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोडीत येथील ही ऊघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांच्या मध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीस कठोर शासन व्हावे अशी मागणीही होत आहे.     कोडीत गावातील वस्तीवर धनगर समाजाचे कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी पाल टाकून उतरले होते.  दि.१०  जूनला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मेंढपाळ कुटुंबातील १३  वर्षांची मुलगी पालाबाहेर खेळत होती. याच सुमारास आरोपी राजू बडदे हा तेथे दुचाकीवरून आला. त्याने शेतातून स्प्रिंकलर मशीन आणायचे आहे. मशीन धरून बसण्यासाठी तू माझ्या बरोबर चल, असे सांगत या मुलीला दुचाकीवरून शेतात घेऊन गेला. शेतात गोठ्यावर दुचाकी उभी करून तिला शेजारच्या चारीत स्प्रिंकलर मशीन आहे, ती घेऊन यायला सांगितले. ती चारीत गेल्यानंतर आरोपीने तिच्या पाठीमागे जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला कोणाला सांगितलंस तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. नंतर पीडित मुलीला पालाजवळच्या रस्त्यावर सोडून दिले.

घाबरलेल्या या मुलीने आपल्या घरी बहीण व आईला हा घडलेला प्रकार सांगितला. मुलीचे वडील बाहेरगावी गेले असल्याने घाबरून त्यांनी कोणाकडे ही याची वाच्यता केली नाही. गुरुवारी सायंकाळी वडील घरी आल्यानंतर त्यांना झाला प्रकार सांगितला. वडिलांनी मुलीला घेऊन थेट सासवड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. सासवड पोलिसांनी आरोपी राजू बापूराव बडदे (वय- ५५ , रा. कोडीत, पुरंदर) याला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.यापूवीर्ही कोडीत मध्ये अशीच घटना घडली होती. त्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. कोडीत गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून बलात्कार, गावठी कट्टे, विनयभंग, खून आदी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत असून पोलिसांनी त्वरीत यावर कारवाई करावी अशी मागणी देदेखील ल ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :PurandarपुरंदरCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिस