शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आई आजारी असल्याने पैशाची गरज असल्याचे सांगून olx वरून चोरीच्या दुचाकींची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 22:42 IST

पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक आधाराच्या मदतीने मनीष अमित नाईकला ताब्यात घेतले.

मुंबई - आईचे ऑपरेशन असल्याने स्वस्तात मोटार सायकल विकायची असल्याची जाहिरात ओएलएक्सवर देऊन चोरीच्या दुचाकी नकली कागदपत्र बनवून विकणाऱ्या एका दुचाकी चोराला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मनीष अमित नाईक (वय 21) राहणार नवघर रोड , मुलुंड असे या अट्टल दुचाकी चोराचे नाव असून त्याच्याकडून आता पर्यंत चार दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यात दुचाकी आणि मुख्यत: ऍक्टिव्हा स्कुटर चोरी झाल्याच्या 4 तक्रारी दाखल झाल्या होत्या.पोलीस या आरोपीचा शोध घेत असतानाच मुलुंडमधील एका नागरिकाने त्याला चोरीची ऍक्टिव्हा विकल्याची तक्रार दिली.गाडी चा क्रमांक आणि गाडीचा इंजिन क्रमांक आरटीओमध्ये जुळत नसल्याने त्याने ताबडतोब नवघर पोलिस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक आधाराच्या मदतीने मनीष अमित नाईक ला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, दुचाकी आणि मुख्यतः ऍक्टिव्हा स्कुटी हा चोर चोरत असे. नंतर या दुचाकी निर्मनुष्य विभागात उभ्या करून तिचे फोटो ओएलएक्सवर विकण्यास टाकत असे. अर्ध्या किंमतीत तो  नकली कागदपत्र बनवून या दुचाकी विकत असे. माझी आई आजारी असून तिच्या शस्त्रक्रिया साठी पैशाची गरज असल्याचे तो त्यावर लिहीत असे. अशा प्रकारे त्याने चोरलेल्या चार ऍक्टिव्हा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली असून मनीषला भा.दं. वि. कलम 389 अंतर्गत अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पोलीस हवालदार विजय महागावकर, पांडुरंग सावंत, पोलीस शिपाई विनायक आंबरे, भरत सूर्यवंशी, अजय पिलानी इत्यादी पथकातील पोलिस  कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने या अट्टल चोराला पकडण्यास यश मिळविले आहे.

टॅग्स :RobberyदरोडाbikeबाईकArrestअटकPoliceपोलिस